राहाता बाजार समितीत कांदा 1250 तर सोयाबीनला 7300 रुपये भाव

राहाता बाजार समितीत कांदा 1250 तर सोयाबीनला 7300 रुपये भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत काल बुधवारी कांद्याला 1250 रुपये भाव मिळाला तर सोयाबीनला जास्तीत जास्त 7300 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला.

बाजार समितीत काल 2281 गोण्या कांद्याची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 950 ते 1250 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 500 ते 900 इतका भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 200 ते 450 रुपये, गोल्टी कांद्याला 600 ते 800 रुपये भाव मिळाला. तर जोड कांदा 100 ते 200 रुपये इतका भाव मिळाला.

डाळिंबाच्या 487 क्रेट्सची आवक झाली. डाळींब नंबर 1 ला 111 ते 150 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 76 ते 110 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 36 ते 75 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 4 ला 10 ते 35 रुपये भाव मिळाला.

सोयाबीनला कमीत कमी 7152 रुपये, जास्तीत जास्त 7300 रुपये तर सरासरी 7225 इतका भाव प्रतिक्विंटलला मिळाला. हरभरा कमीत कमी 4450, जास्तीत जास्त 4470 तर सरासरी 4460 रुपये इतका भाव मिळाला. मकाला कमीत कमी 2286 रुपये, जास्तीत जास्त 2350 रुपये, तर सरासरी 2300 रुपये इतका भाव मिळाला, ज्वारीला सरासरी 1851 रुपये इतका भाव मिळाला, अशी माहिती राहाता बाजार समितीचे सचिव उध्दव देवकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.