राहाता बाजार समितीत कांदा 1100 रुपये तर सोयाबीनला 7315 रुपये भाव

राहाता बाजार समितीत कांदा 1100 रुपये तर सोयाबीनला 7315 रुपये भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याला 1100 रुपये भाव मिळाला. तर सोयाबिनला जास्तीत जास्त 7315 रुपेये प्रतिक्विंटलला भाव मिळाला.

बाजार समितीत काल 2138 गोण्या कांद्याची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 900 ते 1100 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 450 ते 850 इतका भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 200 ते 400 रुपये, गोल्टी कांद्याला 500 ते 700 रुपये भाव मिळाला. तर जोड कांदा 100 ते 200 रुपये इतका भाव मिळाला. डाळिंबाच्या 193 क्रेटसची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 91 ते 125 रुपये भाव मिळाला.

डाळिंब नंबर 2 ला 61 ते 90 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 31 ते 60 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 4 ला 10 ते 30 रुपये भाव मिळाला. सोयाबिनला कमीत कमी 7280 रुपये, जास्तीत जास्त 7315 रुपये, तर सरासरी 7300 इतका भाव प्रतिक्विंटलला मिळाला. हरबरा सरासरी 4400 रुपये इतका भाव मिळाला. मकाला कमीत कमी 2256रुपये, जास्तीत जास्त 2325 रुपये, तर सरासरी 2290 रुपये इतका भाव मिळाला, अशी माहिती राहाता बाजार समितीचे सचिव उध्दव देवकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.