राहाता बाजार समितीत कांद्याला 2300 रुपये भाव

राहाता बाजार समितीत कांद्याला 2300 रुपये भाव
File Photo

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

काल गुरुवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) 5308 गोणी कांद्याची आवक (Onion Inward) झाली. कांद्याला (Onion) 2300 रुपये भाव मिळाला तर डाळिंबाच्या (Pomegranate) 6942 क्रेटसची आवक झाली. कांदा (Onion) नंबर 1 ला प्रति क्विंटलला 1800 ते 2300 असा भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 1250 ते 1750 असा भाव मिळाला.

कांदा (Onion) नंबर 3 ला 600 ते 1200 रुपये इतका भाव मिळाला. गोल्टी कांदा (Onion) 1300 ते 1600 व जोड कांदा 100 ते 600 रुपये भाव मिळाला. डाळिंबाची (Pomegranate) 6942 क्रेट्सची आवक झाली. प्रति किलोला डाळिंब (Pomegranate) नंबर 1 ला 131 ते 205 इतका भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 86 ते 130 रुपये इतका भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 41 ते 85 रुपये व डाळिंब नंबर 4 ला 2.50 ते 40 रुपये असा भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.