राहाता बाजार समितीत 5833 कांदा गोण्यांची आवक
File photo

राहाता बाजार समितीत 5833 कांदा गोण्यांची आवक

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

काल सोमवारी राहाता बाजार समितीत (Rahata market committee) 5833 गोणी कांद्याची आवक (Onion Inward) झाली. कांद्याला (Onion) 2150 रुपये भाव मिळाला तर डाळिंबाच्या (Pomegranate) 8786 क्रेट्सची आवक झाली. कांदा (Onion) नंबर 1 ला प्रति क्विंटलला 1850 ते 2150 असा भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 1500 ते 1800 असा भाव मिळाला.

कांदा (Onion) नंबर 3 ला 550 ते 1450 रुपये इतका भाव मिळाला. गोल्टी कांदा 1400 ते 1700 व जोड कांदा 100 ते 500 रुपये भाव मिळाला. डाळिंबाची (Pomegranate) 8786 क्रेट्सची आवक झाली. प्रति किलोला डाळिंब (Pomegranate) नंबर 1 ला 131ते 205 इतका भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 86 ते 130 रुपये इतका भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 41 ते 85 रुपये व डाळिंब नंबर 4 ला 2.50 ते 40 रुपये असा भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.