राहाता बाजार समितीकडे 6 कोटींच्या ठेवी

राहाता बाजार समितीकडे 6 कोटींच्या ठेवी

इतरांना कर्ज काढून करावा लागतो पगार

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राज्यातील अनेक बाजार समित्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे कर्मचार्‍यांचे पगार कर्ज काढून करावे लागतात. मात्र राहाता तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीकडे सहा कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. त्यामुळेच राज्यातील बाजार समित्यांमध्ये राहाता तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचा अहवाल क्रमांक असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.

राहाता तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सभेस उपस्थित शेतकरी व्यापारी आडतदार यांना मार्गदर्शन करताना ना. विखे पाटील बोलत होते. याप्रसंगी सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, उपसभापती आण्णासाहेब कडू, मुकुंदराव सदाफळ, भाऊसाहेब जेजुरकर, नितीराव कापसे, अ‍ॅड. रघुनाथ बोठे, सहायक निबंधक रावसाहेब खेडकर, कैलासबापू कोते, बाळासाहेब डांगे, वाल्मिकराव गोर्डे, सतीश बावके, नंदकुमार जेजुरकर, बाळासाहेब गाडेकर, खडकेवाकेचे सरपंच सचिन मुरादे, सचिव उद्धव देवकर यांच्यासह सर्व संचालक, सभासद, व्यापारी व कामगार उपस्थित होते.

ना. विखे पाटील म्हणाले, स्वच्छ व पारदर्शी कारभाराव्दारे शेतकर्‍यांचा विश्वास संपादीत करणार्‍या राज्यातील बाजार समित्यांमध्ये राहाता तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचा अव्वल क्रमांक आहे.

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विस्तारीकरणासाठी सुमारे दीडशे कोटी रुपयांची 25 एकर जमीन उपलब्ध करून दिली आहे. या जमिनीत नवनवीन तंत्रज्ञानावर आधारित शेतकरी हिताचे उपक्रम व प्रकल्प उभारले पाहिजे. वातानुकूलित फुलांचे सेल हाऊस उभारून राज्यच नव्हे तर देशातील फुलांची निर्यात करणारे केंद्र म्हणून राहत्याला बनवण्याचा प्रयत्न करावा. समृद्धी महामार्ग विमानतळ तसेच रेल्वे यांचा शेतकर्‍यांना जास्तीत जास्त उपयोग कसा होईल या दृष्टीने बाजार समितीने कार्य करणे गरजेचे आहे. त्याकरिता गरज भासल्यास देशातील अन्य बाजार समितीचा अभ्यास दौरा करून राहाता बाजार समितीत अधिकाअधिक प्रकल्प व शेतकरी हिताच्या सुविधा निर्माण कराव्यात अशा सूचनाही यावेळी त्यांनी बाजार समितीच्या सभापती व संचालकांना दिल्या.

याप्रसंगी बाजार समितीचे सचिव उध्दव देवकर यांनी अहवाल वाचन केले. विषय पत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजुर करण्यात आले. माजी सभापती बापूसाहेब आहेर यांनी मनोगत व्यक्त केले.आभार संचालक संतोष गोर्डे यांनी मानले.

याप्रसंगी संचालक बाबासाहेब शिरसाठ, विजयराव कातोरे, ज्ञानदेव चौधरी, दत्तात्रय गोरे, दिलीपराव गाडेकर, जालिंदर गाढवे, राहुल धावणे, शांताराम जपे, सुभाषराव गायकवाड, राजेंद्र धुमसे, सचिन कानकाटे, निलेश बावके, बाबासाहेब कांदळकर, रंजनाताई लहारे, मिनाताई निर्मळ, श्रीरामपूरचे गिरीधर आसने, बाबासहोब चिडे, सुभाष शिंदे, रावसाहेब देशमुख, निवास त्रिभुवन, आर. बी. चोळके, संजय चोळके, बाबुराव लोंढे, कैलास सदाफळ, नानासाहेब बोठे, मधुकर कोते, दिगंबर कोते, सुभाष गमे, पी. डी. गमे, बाळासाहेब गमे, संदिप दंडवते, कानिफ बावके, सुदामराव सरोदे, संदिप लहारे, बापुसाहेब लहारे, भिमराज निर्मळ, भाउसाहेब घोरपडे, कृषी अधिकारी आबासाहेब भोरे, विक्रम तुरकणे, जालिंदर तुरकणे, रघुनाथ गाडेकर, रावसाहेब बनसोडे आदी उपस्थित होते.

श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याबाबत पुढील आठवड्यात गणेश परिसरातील जनसेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांची बैठक बोलविण्यात येणार असल्याचे महसुलमंत्री विखे पाटील यांनी सांगितले. त्यांनी यावेळी थोरात व कोल्हे यांच्यावर टिका केली.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com