राहाता बाजार समितीत 12 हजार गोणी कांद्याची आवक

राहाता बाजार समितीत 12 हजार गोणी कांद्याची आवक

राहाता |प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत काल मंगळवारी 12 हजार 28 गोणी कांदा आवक झाली. एक नंबर कांद्याला 1 हजार ते 1400 इतका भाव प्रतिक्विंटलला मिळाला.

कांदा नं. 2 ला 650 ते 950 रुपये, कांदा क्रमांक 3 ला 200 ते 600 रुपये इतका भाव मिळाला. गोल्टी कांदा 700 ते 900 रुपये, जोड कांदा 100 ते 250 रुपये असा भाव मिळाला.

चिकूची 20 क्रेटस इतकी आवक झाली. चिकुला कमीत कमी 500 व जास्तीत जास्त 1600 रुपये असा भाव मिळाला. सरासरी 1600 रुपये भाव मिळाला.

डाळींबाची 1865 क्रेटस इतकी आवक झाली. काल एक नंबर डाळींबाला प्रतिकिलो 91 ते 120 रुपये, डाळींब नं. 2- 61 ते 90 रुपये, डाळींब नं. 3- 31 ते 60 रुपये, डाळींब नं. 4- 2.50 ते 30 रुपये इतका भाव प्रतिकिलोला मिळाला.करोना संसर्गाची परिस्थिती भयंकर असतानाही केवळ शेतकर्‍यांचे नुकसान होऊ नये म्हणून राहाता बाजार समितीचे मार्गदर्शक आ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे सूचनेनुसार राहाता बाजार समितीमधील सर्व प्रकारच्या शेतीमालाच्या खरेदी विक्रीचे व्यवहार दररोज चालू आहेत.

त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे, यासाठी बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब जेजुरकर, उपसभापती बाळासाहेब जपे, सर्व संचालक मंडळ, सचिव उध्दव देवकर, सर्व अधिकारी व कर्मचारी, बाजार समितीमधील आडते व्यापारी, कामगार त्यांची जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडत आहेत. वास्तविक पाहाता करोनाच्या पार्श्वभुमिवर राज्यातील इतर बाजार समित्या बंद असताना राहाता बाजार समिती शेतकरी हितासाठी करोना नियमांचे काटेकोर पालन करत सुरु आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com