जनावरांच्या बाजारात गाय विकली तब्बल 'एवढ्या' लाख रूपयांना

लोणीचा जनावरांचा बाजार सुरू
जनावरांच्या बाजारात गाय विकली तब्बल 'एवढ्या' लाख रूपयांना

अस्तगाव, लोणी |वार्ताहर| Astgav

राहाता बाजार समितीच्या (Rahata Market Committee) अंतर्गत येणार्‍या लोणी (Loni) येथील जनावरांच्या बाजारात (Animal Market) 1 गाय (Cow) 1 लाख 41 हजारात विकली गेली, अशी माहिती राहाता बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब जेजुरकर (Speaker Bhausaheb Jejurkar) यांनी दिली.

करोनाच्या पार्श्वभूमीवर बर्‍याच खंडानंतर राहाता बाजार समितीचा (Rahata Market Committee) लोणी (Loni) येथील बाजार सुरु झाला आहे. आ. राधाकृष्ण विखे पाटील (MLA Radhakrishna Vikhe Patil) यांनी जनावरांच्या बाजारला खास परवानगी घेतली आहे. त्याचा फायदा जिल्ह्यातील बहुतांशी बाजार समितीला झाला आहे. मागील आठवड्यापासुन जनावरांचा बाजार सुरु झाला आहे. यामुळे शेतकरी वर्ग तसेच व्यापारी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. दुसर्‍या दिवशी जवळपास साडे तीन कोटीची उलाढाल झाली.

काल बुधवारी बाजारात एका व्यापार्‍याकडून सिन्नर (Sinnar) तालुक्यातील सोमठाणे (Somthane) येथील शेतकरी श्री. धाकरट यांनी 1 लाख 41 हजाराला गाय खरेदी केली आहे. जनावरांचा बाजार सुरु झाल्याने वाहनधारक, हॉटेल व्यावसायिक, तसेच व्यापारी वर्ग यांची आर्थिक उलाढाल सुरु झाली. शेतकरी व गोपालक यांनाही नविन गाय घेणे व विकणे यासाठी या बाजारामुळे आधार मिळाला आहे.

राहाता बाजार समितीच्या (Rahata Market Committee) साकुरी (Sakuri) येथील आवारात कांदे (Onion), डाळींब (Pomegranate), तसेच अन्य मालाचा लिलाव सुरु आहे. आ. विखे पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे या बाजार समितीने आपला वेगळेपणा जपला आहे.

करोनाच्या पार्श्वभुमीवर शेतकरी वर्गाची आपला माल विक्रीसाठी नेता न आल्याने मोठे नुकसान झाले. आ. विखे पाटील (MLA Radhakrishna Vikhe Patil) यांनी यासाठी प्रयत्न करुन बाजार समितीतील शेतीमालाची खरेदी विक्री सुरु केली.

यावेळी उपसभापती बाळासाहेब जपे, सचिव उध्दव देवकर, संचालक दिपकराव रोहोम, चंद्रभान बावके, सखाहरी सदाफळ, बापुसाहेब आहेर, शरदराव मते, वाल्मिकराव गोर्डे, गोरक्षनाथ गोरे, यशवंतराव चौधरी, कृष्णकांत गोरे, देवेंद्र भवर, रमणलाल कुंकूलोळ, प्रा. सुनिल गमे, साहेबराव काटकर, बाळासाहेब वाबळे, किरण दंडवते, सुनिल जपे, सौ. माधुरी दळे, श्रीमती सुनिता वहाडणे, सौ. अंजली कदम यांचेसह सेवकवृद उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com