विजेचा दाब वाढल्याने अनेक घरातील विजेची उपकरणे जळाली

राहाता तालुक्यातील साकुरीची घटना
विजेचा दाब वाढल्याने अनेक घरातील विजेची उपकरणे जळाली

राहाता | प्रतिनीधी | Rahata

अचानक विजेचा दाब (Electric pressure) वाढल्याने अनेक नागरिकांच्या घरातील विद्युत उपकरणे जळाल्याची घटना राहाता (Rahata) तालुक्यातील साकुरी (Sakuri) गावात घडली आहे. या प्रकरणी महावितरणने (MSEDCL) तातडीने लक्ष घालण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, गुरुवारी सायंकाळी साडेसहा ते सात वाजेच्या दरम्यान रिमझिम पाऊस सुरू असताना साकुरी येथील सिद्धार्थनगर (Sidhartnagar) तसेच नम्रता नगर (Namrata Nagar) परिसरात अचानक विजेचा दाब वाढल्याने अनेक ग्रामस्थांच्या घरातील टि.व्ही (TV), फॅन (Fan), फ्रीजसह (Fridge) इतरही विद्युत साहित्य जळाल्याची घटना घडली आहे. तर उच्च विद्युत दाबामुळे काही घरांतील विद्युत ताराही तुटून पडल्या.

अचानक घडलेल्या या प्रकाराने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. भितीपोटी अनेक नागरिकांनी आपापल्या घरातील विद्युत पुरवठा बंद ठेवत अंधारात रात्र काढणे पसंत केले. दुसऱ्या दिवशी सकाळी देखील उच्च दाबाने विद्युत पुरवठा सुरू होता.त्यामुळे महावितरणने तातडीने विद्युत पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com