राहाता लोकअदालतमध्ये एकाच दिवसात 15 कोटी 40 लाखांची वसुली

2039 प्रकरणी निकाली
राहाता लोकअदालतमध्ये एकाच दिवसात 15 कोटी 40 लाखांची वसुली

राहाता |वार्ताहर| Rahata

येथील राष्ट्रीय लोकअदालतमध्ये शनिवार दि. 12 रोजी 2 हजार 39 प्रकरणे निकाली काढण्यात आले असून, 15 कोटी 40 लाख 29 हजारांची वसुली करण्यात आलेली आहे.

दिवाणी व फौजदारी न्यायालय राहाता येथे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये प्रलंबीत व दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात आलेल्या प्रकरणांपैकी 2039 प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यातून 15 कोटी 40 लाख 29 हजार 10 रुपयांची वसुली झाली. या लोकअदालतमध्ये दाखलपूर्व प्रकरणांमध्ये राष्ट्रीयीकृत बँक, ग्रामपंचायत नगरपंचायत, एम. एस. इ. बी. या संस्थांची तसेच साईबाबा संस्थानची असे एकूण 7 हजार 993 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 1364 प्रकरणे निकाली काढण्यात आली.

त्यातून 3 कोटी 28 लाख 65 हजार 756 रुपयांची वसुली झाली. सदर लोकन्यायालयात बँकेच्या कर्जदारांनी बँकेकडून कर्ज रकमेस मिळणार्‍या सवलतीचा फायदा घेतला. शिर्डी नगरपालिका हद्दीतील पालखी रोडचे भूसंपादन, नुकसान भरपाई मिळण्याबाबतच्या 14 प्रकरणांना साईबाबा संस्थान शिर्डी व लाभार्थी यांनी सामोपचाराने प्रकरणे मिटविली तसेच 690 प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली.

लोकअदालतच्या उद्घाटनप्रसंगी राहाता न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश अदिती नागोरी यांनी उपस्थित सर्व पक्षकार, कर्जदार यांना जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढून लोकअदालतचा लाभ घेण्याचे आवाहन केले होते.

याप्रसंगी न्यायाधीश एस. व्ही. खैरे, श्रीमती ए. ए. कुलकर्णी यांनी पॅनल प्रमुख म्हणून काम पाहिले तर ए. एस. देशपांडे ,ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, आदी उपस्थित होते. सदर लोकअदालतसाठी तीन पॅनल तयार करण्यात आले, लोकअदालत यशस्वी करण्यासाठी राहाता वकील संघाच्या विधिज्ञांचे सहकार्य लाभले. तसेच राहाता न्यायालयातील सहा. अधीक्षक आर. एन. पाठक, डी. बी. बिदे तसेच विधीसेवा समितीचे कर्मचारी एस. एल. शिंदे व न्यायालयीन कर्मचारी वृंद यांनी लोकअदालतसाठी सहकार्य केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com