राहाता तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ

राहाता तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ

राहाता | तालुका प्रतिनिधी

राहाता तालुक्यात बिबट्याची दहशत कायम आहे. गुरुवारी मध्यरात्रीनंतर अस्तगावला ४ शेळ्या बिबट्याने फस्त केल्या आहेत.

अस्तगाव येथील गोगलगाव रोड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रस्त्यापासून काही अंतरावर अंबादास गणपत जेजुरकर यांची गट नंबर ६२४ मध्ये वस्ती आहे. त्यांच्या शेडमध्ये बांधलेल्या एक साडेतीन वर्षाची, एक दोन वर्षाची, महिन्याचा एक बकरु व ४ वर्ष वयाची एक शेळी अशा चार शेळ्या बिबट्याने मध्यरात्री दिड वाजता हल्ला करुन त्या फस्त केल्या. हा प्रकार अंबादास व त्यांच्या कुटूंबियांच्या सकाळी लक्षात आला. यातील एक शेळी खुंट्यावर ठार केली. तीन शेळ्या घरापासून २० ते ३० मीटर अंतरावर ओढत नेवून तेथे त्या फस्त केल्या. एक महिन्याच्या बकराचे केवळ चार पायच शिल्लक होते.

दरम्यान एक मादी बिबट्या व त्याचे बछडे असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. काल सकाळी सहा वाजता एकाने नगर. मनमाड रस्ता ओलांडताना हे दोन बिबटे पाहिल्याचे सांगण्यात येते. अस्तगाव येथे वनविभागाचे संजय साखरे व सहायक पशुधन अधिकारी डॉ. उमेश पंडुरे यांनी केला.

आडगाव| वार्ताहर

शुक्रवारी पहाटे ३ वाजता राहाता तालुक्यातील आडगाव बु. येथे सोमनाथ गेणू वराडे यांच्या ३ मेंढ्या बिबट्याने फस्त केल्या तर ३ मेंढ्या जखमी केल्या आहेत. या घटनेने मेंढपाळांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे. सोमनाथ वराडे यांच्या रानात शेडजवळ तारेच्या कुंपनात मेंढ्या होत्या. हे तारेचे कुंपन पक्के नसल्याने त्यातून बिबट्यांनी सहज प्रवेश मिळविला. मेंढ्यांच्या कळपातील तीन मेंढ्या ओढून नेल्या व त्या ठार करत फस्त केल्या. त्यातील एक मेंढी जवळ तर दोन या अंतरावर ओढून नेल्या. त्यांच्या शेतात दूर अंतरावर चारीच्या कडेला त्या मेंढ्या शेडजवळ होत्या. या तीन मेंढ्या फस्त केल्या. या व्यतिरिक्त चार मेंढ्यांना दात लागले आहेत. त्याही जखमी आहेत. या जखमी मेंढ्यांवर उपचार केले आहेत. मात्र त्यांना दात लागले आहेत.

दरम्यान घटनेची माहिती वनविभागाचे श्री. साखरे यांना दिल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन पाहणी केली व हा हल्ला बिबट्याचाच असल्याचे त्यांनी सांगितले. वनविभागाचे संजय साखरे व डॉ. निधाने यांनी पशुवैद्यकिय विभागाच्या वतीने पंचनामा केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com