रांजणखोल परिसरात जोरदार पाऊस

पेरणीपूर्व मशागती कामांना वेग
रांजणखोल परिसरात जोरदार पाऊस
File Photo

रांजणखोल | वार्ताहर

राहाता तालुक्यातील रांजणखोल परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली.

सुमारे दोन तास कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे बळीराजासह नागरिक सुखावले असून खरीपाच्या पेरणीला गती मिळणार आहे.

File Photo
दरवाजाची कडी लावायची विसरली आणि मध्यरात्री घडले असे...

काल सकाळपासूनच कमालीचा उकाडा निर्माण झाला होता. दुपारी एक वाजेच्या सुमारास वादळ सुटले. त्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली.

चार दिवसांपासून दररोज ढगाळ वातावरण तयार होत आहे रात्रीचे तापमानही आता कमालीचे खाली घसरले पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे शेतकरी आता पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला लागला आहे.

मान्सूनपूर्व पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पावसाने उकाडाही कमी झाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com