चार दिवसात दगावल्या ११ गायी; पशुवैद्यकीय यंत्रणेचे दुर्लक्ष

लाळ्या खुरकतचा प्रादुर्भाव
चार दिवसात दगावल्या ११ गायी; पशुवैद्यकीय यंत्रणेचे दुर्लक्ष
File Photo

अस्तगाव (वार्ताहर)

राहाता तालुक्यातील केलवड परिसरात जनावरांना लाळ्या खुरकत चा प्रादुर्भाव वाढत तेथील शेतकऱ्यांच्या ११ गायी दगावल्या आहेत. या गायींना वेळेत उपचार मिळत नसल्याने या गायी दगावल्याचा आरोप शेतकरी बाळासाहेब सुधाकर गमे यांनी केला आहे.

या गायींना लसीकरण केले नसल्याने शेतकऱ्यांवर ही वेळ आली आहे. या ११ गायी केवळ तीन ते चार दिवसात दगावल्याने केलवड भागातील शेतकरी हादरले आहेत. संदीप मधुकर गमे यांची एक गाय, किशोर मधुकर गमे यांच्या २ गायी, मच्छिंद्र गमे यांची १, नाना राऊत यांची १, बाबासाहेब जटाड यांची १, सोनवणे यांची १, अशोक घोरपडे यांची १ गाय, वसंत ठोबरे यांच्या २ गायी अशा एकूण ११ गायी दगावल्या आहेत. गायींना लाळ्या खुरकतांचा प्रादुर्भाव होवून त्यांना अटॅक आल्यासारखे होते आणि त्यात या गायी दगावत आहेत.

केलवड हे जिरायती टापूतील गाव असून शेती पावसावर आवलंबून आहे. त्या भागातील शेतकरी गायी पाळुन दुग्धव्यावसाय करुन आपली उपजिविका भागवतात. सहा ते सात हजार लिटर दूधाचे संकलन या गावातून होते. सर्वसामान्यांना आधार असणाऱ्या या दूध धंद्यासाठी आपल्या गोठ्यातील गायी अशा आजारांनी दगावत असल्याने मोठा अर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. केलवड भागातील अजुनही काही गायी आजारी आहेत. त्यामुळे शेतकरी हादरुन गेले आहेत. महागड्या गायी आणि त्यातच दभत्या, त्याचबरोबर काही गाभण गायी आहेत. जिल्हा पशुवैद्यकिय अधिकारी यांनी या प्रकाराची दखल घेवुन खास यंत्रणे मार्फत केलवड च्या गायींना व जनावरांना लसीकरण करावे, अशी मागणी होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com