
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता तालुक्यातील 12 ग्रामपंचायत निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या बुधवारी तिसर्या दिवशी 11 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
कोर्हाळे येथे सदस्य पदासाठी 1, दुर्गापूर ग्रामपंचायतीसाठी 7 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. रुई ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासाठी 1 अर्ज, पुणतांबा 1 अर्ज या चार ग्रामपंचायतींनी दहा सदस्य पदासाठी अर्ज दाखल केले आहेत. तर सरपंचपदासाठी निमगाव कोर्हाळे ग्रामपंचायतीसाठी 1 अर्ज दाखल केला आहे.अन्य दहेगाव कोर्हाळे, धनगरवाडी, वाकडी, दाढ बुद्रुक. पिंपरी निर्मळ, कनकुरी, चितळी या ग्रामपंचायतीसाठी अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही.