तरुण शेतकऱ्याचा शेततळ्यात पडून मृत्यू

तरुण शेतकऱ्याचा शेततळ्यात पडून मृत्यू
Sarvmat update

शिर्डी | प्रतिनिधी

राहाता (Rahata) तालुक्यातील रुई (Rui) येथील निलेश हिमंतराव कडू (वय २३) हा तरुण शेततळ्याच्या कडेला चपला सोडून बसलेला असताना तोल गेल्याने शेततळ्यात पडून बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेने रुई परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Sarvmat update
विखे कारखाना कामगार पतपेढीच्या कर्मचाऱ्याची गळफास लावून आत्महत्या

हिमंतराव पतंगराव कडु यांच्या मालकीच्या शेतावर त्यांनी शेततळे बांधले आहे. त्या शेततळ्यात बुडून तरुणाचा अकाली मृत्यू झाल्याने रुई गावात शोककळा पसरली आहे.

Sarvmat update
बिबट्याच्या हल्ल्यात चार शेळ्या ठार

मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी राहता प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आल्याची माहिती शिर्डी पोलीस (Shirdi Police) स्टेशनचे पोलीस नाईक गणेश सोनवणे यांनी दिली. शिर्डी पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून गुन्हा दाखल केला असून अधिक तपास शिर्डी पोलिस करीत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com