शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ या ठिकाणी अहमदनगर राज्य उत्पादन शुल्क विभागासह

श्रीरामपूरच्या भरारी पथकाने काल अचानक छापा टाकून बनावट दारु व वाहतूक करणारे वाहने असा एकूण 20 लाख 80 हजार 455 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

लॉकडाऊनच्या पार्शभूमीवर राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे तसेच अहमदनगर राज्य उत्पादन अधीक्षक, गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र.2 श्रीरामपूर यांच्या पथकाने राहाता तालुक्यातील निर्मळ पिंपरी, या ठिकाणी छापा टाकून गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेली विदेशी दारुचा मोठ्या प्रमाणावर साठा व दोन आयशर टेम्पो, एक कार तसेच एक दुचाकी वाहन असा मुद्देमाल जप्त केला असून सदर कारवाईमध्ये मॅकडोल व्हिस्की, इम्पेरिअल ब्लू, ओसी ब्लू, रॉयल स्टग ब्लेंडर्स प्राईड, मास्टर ब्लेंड तसेच देशी दारू भिंगरी संत्रा व बॉबी आदी नामांकित कंपन्यांच्या दारुच्या बाटलीचे बनावट बुच्चन मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आली.

सदर कारवाईत पथकाने आरोपी दीपक मच्छिद्र निर्मळ ( रा. निर्मळ पिंपरी, ता. राहता), दीपक भाऊसाहेब पारधी (रा. जांबूत, ता. संगमनेर), किरण शांताराम गुंजाळ (रा. कासार दुमाला, ता. संगमनेर), राजेंद्र सीताराम रहाणे (रा. चंदनापुरी, ता. संगमनेर) या चार आरोपीस अटक करून त्यांच्याकडून रुपये 20.80,445/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपींना राहता न्यायालयात हजर केले असता त्यांना दिनांक 12/4/2021 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या कारवाईत प्रभारी उपाधीक्षक संजय सराफ, निरीक्षक अनिल पाटील, कोपरगाव विभागाचे निरीक्षक संजय कोल्हे, पी. बी. अहिरराव, दुय्यम निरीक्षक के. यु. छत्रे, एम. डी. कोंडे, ए. सी. खाडे, डी. वाय. गोलेकर, नंदकुमार परते, एन.आर.वाघ, ए.पी. तनपुरे तसेच जवान विकास कंठाळे, सुनील वाघ, दीपक बर्डे, प्रवीण साळवे, वर्षा जाधव , राहुल थोरात, टी.आर. शेख, सुनील निमसे आदींनी सहभाग घेतला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास प्रभारी निरीक्षक प्रकाश अहिरराव हे करीत आहेत.