दुर्गापूर शिवारात बिबट्याची दहशत; भर दिवसा घेतला सात कोकरांचा बळी

File Photo
File Photo

हनुमंतगाव | वार्ताहर

हनुमंतगाव राहत्यातील दुर्गापुर शिवारातील सुनील सहादराव जाधव यांच्या शेतात सात निष्पाप मेंढ्यांच्या कोकरांचा बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेला आहे .

सुनील जाधव यांचे गट नंबर ३९७/५मध्ये मेंढ्या चारण्यासाठी मेंढपाळ आले आहेत. रात्रीच्या वेळी ते त्यांचे शेतात मेंढ्या बसवितात. मेंढ्यांची छोटी कोकरे दिवसभर फिरू शकत नसल्याने तात्पुरत्या आडोशाला थांबतात. मेंडके यांचे घरातील माणसे स्वयंपाक धुणेपाणी करण्यासाठी घरी असतात.

दुपारच्या वेळेस घरातील महिला धुण्यापाण्यासाठी बाहेर गेले असता संधी साधून बिबट्याने राहूटीवर हल्ला केला.काही क्षणात छोट्याशा कोकरांचा बळी घेतला.घरातील माणसे राहूटीवर आल्यावर ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली. त्यांनी मेंढपाळांना ही कल्पना दिली .

अलीकडच्या काळात छोटी मुले, कुत्रे तसेच शेळी व मेंढीची पिले यावर हल्ला करून सहज शिकार करण्यावर बिबट्यांचा जोर वाढला आहे. या भागातून पकडून नेलेली बिबटे काही काळातच पूर्व ठिकाणी येत असल्याचे दिसून येत आहे. बिबट्यांना दूर अंतरावर सोडण्याची गरज आहे परंतु फॉरेस्ट खाते याबाबत उदासीन असल्याचे दिसून येते किंवा काही नियमामुळे त्यांना ही गोष्ट करता येत नाही.

परंतु सामान्य माणसाचा जीव मात्र टांगणीला लागलेला आहे. शेतात काम करणारे मजूर त्यांच्यासोबत आलेली छोटी मुले यांचे संरक्षण करण्याची कसरत करावी लागत आहे. याबाबत सर्वव्यापी धोरण घेऊन पकडलेले बिबटे दूर अंतरावर सोडले तर कदाचित हा प्रश्न मिटू शकेल प्रशासनाने याबाबत योग्य ते कार्यवाही करावी अशी मागणी दुर्गापूर ग्रामस्थांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com