राहाता तालुक्यात बहरली ड्रॅगन फ्रुटची शेती

कृषी विद्यार्थ्यांनी सांगितले महत्त्व
राहाता तालुक्यात बहरली ड्रॅगन फ्रुटची शेती

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

अंजीर (Fig), द्राक्षे (Grapes), केळी (Bananas) अशा पारंपारिक फळांची शेती (Fruit farming) न करता प्रगतिशील युवा शेतकरी श्रीकांत गजानन ढोकचौळे (MB­,Finance) व चंद्रकांत गजानन ढोकचौळे (MSC.Statistics) या उच्चशिक्षित बंधूंनी नोकरी सोडून नांदूर येथील शिवारात 1.5 एकर क्षेत्रावर ड्रॅगन फ्रुटची (Dragon Fruit) बाग फुलवली असून, तरुणांसाठी ड्रॅगन फ्रूट शेतीचा (Dragon Fruit) ते नवा आदर्श ठरत आहेत.

क. का. वाघ कृषी महाविद्यालय, नाशिकचे (Nashik) विद्यार्थी प्राजक्ता सोपान वडितके, ऋतुजा बाबासाहेब वाकचौरे, दुर्गा गवराम म्हस्के यांनी नांदूर येथील ढोकचौळे बंधूंनी साकारलेल्या ड्रॅगन फ्रूट (Dragon Fruit) बागेला भेट देऊन त्याची पाहणी केली. तसेच त्याचे फायदे व तोटे याबाबतची माहिती शेतकर्‍यांना दिली.

ड्रॅगन फ्रूटची (Dragon Fruit) वाढती मागणी, कमी पुरवठा व त्याचे औषधी गुण (Medicinal properties) ओळखता इंटरनेटच्या माध्यमातून माहिती मिळवून, नावीन्याचा ध्यास असलेल्या ढोकचौळे बंधूंनी 2017 मध्ये आपल्या 1.5 एकर शेतावर ड्रॅगन फुटची (Dragon Fruit) लागवड केली.

ढोकचौळे यांनी ड्रॅगन फ्रूट (Dragon Fruit) शेतीत वापरलेल्या काही खास तंत्रज्ञान पध्दती -सामान्यतः सिमेंट पोलवर सिमेंट रिंग वापरतात पण यांनी असे न करता तेथे पैश्याची बचत करुन जुने टायर खरेदी केले. हे टायर आपण 50 वर्षापर्यंत (म्हणजेच ड्रॅगन पिकाचा कालावधी संपेपर्यंत) वापरू शकतो, असे सांगितले.

सरकार आता ड्रॅगन फ्रुटची (Dragon Fruit) शेती करणार्‍या शेतकर्‍यांसाठी एक लाख साठ हजार रुपये(1,60,000रु.) पर्यंत सबसिडी उपलब्ध करून देणार आहे. भारतातील ड्रॅगन फ्रूट (India Dragon Fruit) ला इतर देशांतील फळांपेक्षा जास्त पसंती मिळते. त्यामुळे भविष्यात आपल्या देशातील ड्रॅगन फ्रूटचे (Dragon Fruit) उत्पादन वाढल्यास निर्यातीत वाढ होऊन भारताच्या जीडीपी (GDP) त त्यामुळे नक्कीच वाढ होईल. या पिकाला आठ महिने फळधारणा येत असल्याने मधील काळात आपण वेलवर्गीय भाज्यांचे आंतरपीक घेऊन नफा मिळू शकतो.

बेरोजगारीचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होणार असून शेतीच आपल्यासाठी कायमस्वरुपी पर्याय ठरणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरणार्‍या युवकांना ढोकचौळे बंधूंचा आदर्श ठरत असून ते शेतकर्‍यांना मार्गदर्शन देखील करणार आहेत. यातून चांगला नफा मिळणार असून दोघे बंधूंनी जिद्द व प्रयत्नाच्या जोरावर राहाता तालुक्यातील सर्वात मोठ्या क्षेत्रावरील ड्रॅगन फ्रूट (Dragon Fruit) शेतीच्या वेगळ्या प्रकारच्या प्रयोगात प्रथमच मिळवलेले हे यश इतरांना नक्कीच प्रेरणादायी असल्याचे क. का. वाघ कृषी महाविद्यालय, नाशिकचे (Nashik) विद्यार्थी प्राजक्ता सोपान वडितके, ऋतुजा बाबासाहेब वाकचौरे, दुर्गा गवराम म्हस्के यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com