गोदावरी उजवा तट कालवा राहाता विभागास उत्कृष्ट सिंचन व्यवस्थापनाचा प्रथम पुरस्कार

पालखेडच्या पिंपळगाव उपसिभागास द्वितीय तर श्रीरामपूरच्या वडाळा उपविभागास तृतीय पुरस्कार
गोदावरी उजवा तट कालवा राहाता विभागास
उत्कृष्ट सिंचन व्यवस्थापनाचा प्रथम पुरस्कार

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

गोदावरी उजवा तट कालवा राहाता या उपविभागिय कार्यालयास उत्कृष्ट सिंचन व्यवस्थापन सांघिक पुरस्कार सन 2021-22 हा प्रथम पुरस्कार मिळाला आहे.

अभियंता दिनाचे औचित्य साधून नाशिकच्या नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय आवार येथे मुख्य अभियंता, उत्तर महाराष्ट्र प्रदेश नाशिक तथा गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ औरंगाबादचे कार्यकारी संचालक डॉ. संजय बेलसरे यांच्याहस्ते हा पुरस्कार राहाता येथील गोदावरी उजवा तट कालव्याचे उप विभागीय अभियंता महेश गायकवाड यांनी स्विकारला. उत्तर महाराष्ट्र (जलसंपदा विभाग) नाशिक अंतर्गत लाभक्षेत्र विकास प्राधिकरण नाशिक आणि अहमदनगर यांचे अंतर्गत उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी, कार्यालय यांना पुरस्कार वितरण आयोजित करण्यात आले होते.

या समारंभास लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अहमदनगरचे अधिक्षक अभियंता प्रशासक इंजि. अरुण नाईक, नाशिक लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता तथा प्रशासक इजि. राजेश गावेर्धने, जलसंपदाचे नाशिक विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे, यांचेसह जलसंपदा विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण नाशिक अंतर्गत पाच विभाग आहेत.

कार्यालय नाशिक पाटबंधारे विभाग नाशिक, मुळा विभाग, अहमदनगर विभाग, पालखेड विभाग, मालेगाव विभाग यात नाशिक विभागातील गोदावरी उजवा तट कालवा उपविभाग राहाता यांना प्रथम पुरस्कार, पालखेड पाटबंधारे विभागाच्या पालखेड पाटबंधारे उपविभागाच्या पिंपळगाव यांना द्वितीय पुरस्कार तर अहमदनगर पाटबंधारे विभागाच्या वडाळा पाटबंधारे उपविभाग श्रीरामपूर यांना तृतीय पुरस्कार मिळाला आहे.

सिंचन व्यवस्थापन संबंधित कामकाजात दिलेल्या योगदानाबद्दल उत्तर महाराष्ट्र प्रदेश कार्यालय मार्फत उपविभागीय कार्यालयांच्या संवर्गात राहाता उपविभागास प्रथम क्रमांक देऊन गौरविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सदर उपविभाग अंतर्गत येणारे शाखा कार्यालय शिर्डी या कार्यालयास शाखा कार्यालयांच्या संवर्गात प्रथम क्रमांक देऊन गौरविण्यात आले आहे. सदर उपविभाग कार्यालयामार्फत मागील 15 वर्षांतील तुलनेने सर्वात जास्त सिंचन पाणीपट्टी 140.65 लक्ष रुपये व बिगर सिंचन पाणीपट्टी 728.03 लक्ष रुपये जमा केली आहे. तरी या कार्यालयातील सर्व शाखा अभियंता,कालवा निरीक्षक, दप्तर कारकून, व वर्ग 4 चे कर्मचारी यांचा कामकजात असलेला सहभाग व परिश्रमामुळे हे शक्य झाले आहे. लाभधारक शेतकरी, बिगर सिंचन संस्था यांनी पाणीपट्टी वसुलीसाठी केलेल्या सहकार्यामुळेच हे यश!

- महेश गायकवाड उपविभागिय अभियंता गोदावरी उजवा तट कालवा उपविभाग राहाता

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com