माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल
सार्वमत

माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल

जमावबंदीचा भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल

Nilesh Jadhav

राहाता | तालुका प्रतिनिधी | Rahata

दुध दरवाढ आंदोलन प्रश्नी माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के यांच्यासह ४० आंदोलकांवर जमावबंदीचा भंग केल्या प्रकरणी राहाता पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहाता येथे दुध दर वाढवून द्या व १० रूपये अनुदान थेट शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करा या मागणीसाठी आ. राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको करत ठिय्या आंदोलन केले होते. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग करून दुध दरवाढ व अनुदान यासाठी बेकायदेशीर जमाव जमवून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी पो. कॉ. दिपक कदम यांच्या फिर्यादी वरूण राहाता पोलीसांनी माजी मंत्री आ राधाकृष्ण विखे, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के, भाजप तालुका अध्यक्ष नंदकुमार जेजूरकर, माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ, गनेश कारखान्याचे अध्यक्ष मुकूंदराव सदाफळ, राहाता पंचायत समिती सभापती सौ नंदाबाई तांबे, सचिन तांबे, उप सभारती ओमेश जपे, डॉ राजेंद्र पिपाडा, चंद्रभान बावके, शरद थोरात, अँड रघुनाथ बोठे, अनिल बोठे, राऊसाहेब देशमुख, वाल्मीकराव गोर्डे, विजय सदाफळ, डॉ धनंजय धनवटे यांच्यासह इतर २५ जणांवर गुन्हा दाखल केला असून तपास स.पो.नी कंडारे हे करत आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com