राहाता तालुक्यात 158 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

राहाता तालुक्यात 158 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

राहाता |का. प्रतिनिधी| Rahata

राहाता (Rahata) तालुक्यात 32 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Patient) दिसून येत आहेत. काल 22 रुग्ण बरे झाल्यामुळे अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या 158 वर जावून पोहोचली आहे. राहाता तालुक्यात आतापर्यंत 21176 करोनाबाधित रुग्ण (covid 19 Positive Patient) आढळून आले. तर 21039 रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यात रुग्णांपैकी खासगी रुग्णालयात 18 तर अँटीजेन चाचणीत (antigen testing) 14 रुग्ण आढळून आले आहेत.

तर 22 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.राहाता तालुक्यातील पिंप्रीनिर्मळ-06, एकरुखे-01, लोणी बुद्रुक-05, गोगलगाव-01, लोणी खुर्द-03, डोर्‍हाळे-01, नांदुर्खी बुद्रुक-03, केलवड बुदु्रुक-01, कोल्हार-01, लोहगाव-02, रामपूरवाडी-01 असे एकूण 25, शिर्डी-05, राहाता-01, व अन्य तालुक्यातील-01 असे एकूण 32 रुग्ण आढळून आले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com