राहाता तालुक्यात 22 करोना बाधित रुग्ण

16 रुग्णांना डिस्चार्ज
राहाता तालुक्यात 22 करोना बाधित रुग्ण

राहाता |का. प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात (Rahata Taluka) 22 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) दिसून येत आहेत. काल 16 रुग्ण बरे होऊन गेल्यामुळे अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या वाढतच आहे.

राहाता तालुक्यात (Rahata) आतापर्यंत 21415 करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 21236 रुग्ण बरे होऊन घरी गेले.

त्यात रुग्णांपैकी जिल्हा रुग्णालयात 00 खासगी रुग्णालयात 14 तर अँटीजेन चाचणीत 08 रुग्ण आढळून आले आहेत. तर 16 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

राहाता तालुक्यातील अस्तगाव-01, राजुरी-01, दुर्गापूर-01, लोणी बुद्रुक-03, केलवड बुद्रुक-01, खडकेवाके-01, कोल्हार-01, सावळीविहिर खुर्द-01, वाकडी-03, पुणतांबा-02, असे एकूण 15 व शिर्डी-00, राहाता-03, अन्य तालुक्यातील-04, असे एकूण 22 रुग्ण आढळून आले आहेत.काल 22 करोना बाधित रुग्ण आढळून आले असून गेल्या दोन दिवसांपासून रुग्णांचा आकडा कमी झाला आहे. यात 16 बरे होऊन घरी गेले तर काही रुग्ण सध्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com