राहाता तालुक्यात 262 जणांना डिस्चार्ज

817 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह; 135 करोनाबाधित रुग्ण
राहाता तालुक्यात 262 जणांना डिस्चार्ज

राहाता |प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात काल 135 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. बरे होवून घरी जाणार्‍यांची संख्या 262 वर जावून पोहोचली आहे. तर 817 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.

राहाता तालुक्यात आतापर्यंत 18651 करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 17740 रुग्ण बरे होवून घरी गेले. ,आज 817 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह आहेत.

त्यात रुग्णांपैकी जिल्हा रुग्णालयात 03 खासगी रुग्णालयात 67 तर अँटीजन चाचणीत 65 रुग्ण आढळून आले आहेत. तर 262 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.

राहाता तालुक्यातील अस्तगाव-07, राजुरी-03, पिंपरी निर्मळ-01, एकरुखे-02,रांजणगाव-01, दाढ बुद्रुक-05, दुर्गापूर-02, चंद्रापृर-06, लोणी बुद्रुक-16, लोणी खुर्द-03, डोर्‍हाळे-06, नांदुर्खी बुदुक-12, केलवड बुदुक-02, कोर्‍हाळे-01, केलवड खुर्द-04, साकुरी-11, कोल्हार-03, बाभळेश्वर बुद्रुक-01, सावळीविहिर बुद्रुक-04, सावळीविहिर खुर्द-01, निघोज-03, रुई-02, पिंपळवाडी-01, वाकडी-09, जळगाव-01, , पुणतांबा-10, रांजणखोल-06, नपावाडी-02, असे एकूण 107, शिर्डी-15, राहाता-07, बाहेरील तालुक्यातील 06 असे एकूण 135 रुग्ण आढळून आले आहे.

काल राहाता तालुक्यात करोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने तालुक्यातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. काल 264 करोनाबाधित रुग्ण आढळून आले होते तर आज 135 करोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने निम्म्याने हा आकडा कमी झाला आहे. त्याच दरम्यान करोनातून बरे होवून घरी गेलल्यांची संख्या 262 वर जावून पोहोचल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. सध्या तालुक्यात केवळ 817 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण असून जिल्ह्यातील व तालुक्यातील विविध रुग्णालयांमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com