राहाता तालुक्यात 147 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

19 करोनाबाधितांची भर; 30 रुग्णांना डिस्चार्ज
राहाता तालुक्यात 147 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

राहाता |का. प्रतिनिधी| Rahata

राहाता (Rahata) तालुक्यात 19 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) दिसून येत आहे. काल 30 रुग्ण बरे होवून गेल्यामुळे अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या 147 झाली आहे.

राहाता तालुक्यात आतापर्यंत 21195 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Patient) आढळून आले. तर 21069 रुग्ण बरे होवून घरी गेले.

त्यात रुग्णांपैकी जिल्हा रुग्णालयात 01 खासगी रुग्णालयात 11 तर अँटीजन चाचणीत 07 रुग्ण आढळून आले आहेत. तर 30 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.

राहाता तालुक्यातील राजुरी-01, दाढ बु-01, दुर्गापूर- 02, लोणी बुद्रुक-03, लोणी खु.-01, नांदुर्खी बुदु्रुक-01, साकुरी-02, कोल्हार-02, बाभळेश्वर बु.-02, पिंपळवाडी-02, वाकडी-01 असे एकूण 18, व राहाता-01 असे एकूण 19 रुग्ण आढळून आले आहेत.

काल राहाता तालुक्यात करोनाबाधितांची संख्या 19 असून 30 जणांना बरे वाटल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे 147 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह दिसून येत असून ते तालुक्यात व तालुक्याबाहेरील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com