सलग दुसर्‍या दिवशीही राहाता तालुक्यात करोना रुग्णांमध्ये वाढ

49 करोनाबाधितांची भर; 15 रुग्णांना डिस्चार्ज
सलग दुसर्‍या दिवशीही राहाता तालुक्यात करोना रुग्णांमध्ये वाढ

राहाता |का. प्रतिनिधी| Rahata

राहाता (Rahata) तालुक्यात नवीन 49 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) दिसून येत आहेत. काल 24 रुग्ण बरे होऊन गेल्यामुळे अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या 198 झाली आहे.तालुक्यात काल सलग दुसर्‍या दिवशी करोना रुग्णांमध्ये (Covid 19 Patient) वाढ झाल्याने चिंता व्यक्त करण्यात आली असून नागरिकांनी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन तहसीलदार कुंदन हिरे (Tahsildar Kundan Hire) यांनी केले आहे.

राहाता तालुक्यात (Rahata) आतापर्यंत 21324 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळून आले. तर 200 रुग्ण बरे होऊन घरी गेले. काल जिल्हा रुग्णालयात 02 खासगी रुग्णालयात 29 तर अँटीजेन चाचणीत 18 रुग्ण आढळून आले आहेत. त्यात ममदापूर-01, हसनापूर-01, दुर्गापूर-02, लोणी बुद्रुक-05, डोर्‍हाळे-10, केलवड बुद्रुक-01, साकुरी-03, पिंपळस-01, कोल्हार-12, वाकडी-02, रामपूरवाडी-01 असे एकूण 39, व शिर्डी-03, राहाता-06 असे एकूण 49 रुग्ण आढळून आले आहेत.

कालच्या 49 करोना रुग्णांमध्ये सुमारे 24 रुग्ण हे दोन महिन्यांपूर्वी तपासणी झालेले असून त्यांचे अहवाल काल आले आहेत. यातल 6 रुग्ण हे बाहेर तालुक्यातील व जिल्ह्यातील रुग्ण आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com