राहाता तालुक्यात करोना रुग्णांमध्ये वाढ

44 करोनाबाधितांची भर; 15 रुग्णांना डिस्चार्ज
राहाता तालुक्यात करोना रुग्णांमध्ये वाढ

राहाता |का. प्रतिनिधी| Rahata

राहाता (Rahata) तालुक्यात काल नवीन 44 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळून आले त्यामुळे अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या 175 झाली आहे. तालुक्यात काल अचानक करोना रुग्णांमध्ये वाढ झाल्याने चिंता व्यक्त करण्यात आली असून नागरिकांनी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन तहसीलदार कुंदन हिरे (Tahsildar Kundan Hire) यांनी केले आहे.

राहाता तालुक्यात (Rahata) आतापर्यंत 21275 करोनाबाधित रुग्ण (Corona Positive Patient) आढळून आले. तर 21136 रुग्ण बरे होऊन घरी गेले.

खासगी रुग्णालयात 28 तर अँटीजेन चाचणीत 16 रुग्ण आढळून आले आहेत. त्यात अस्तगाव-04, एकरुखे-01, रांजणगाव-01, लोणी बुद्रुक-05, डोर्‍हाळे-04, कनकुरी-02, कोर्‍हाळे-02, साकुरी-02, बाभळेश्वर बुद्रुक-01, सावळीविहिर बुद्रुक-01, वाकडी-01, पुणतांबा-01 असे एकूण 14, व शिर्डी-01, राहाता-12, अन्य तालुक्यातील-06, असे एकूण 44 रुग्ण आढळून आले आहेत.

कालच्या 44 करोना रुग्णांमध्ये सुमारे 20 रुग्ण हे दोन महिन्यांपूर्वी स्वॅब घेतलेले असून त्यांचे अहवाल काल आलेले असे आहेत. कालचे नवीन 24 रुग्ण असून त्यात 6 हे बाहेर तालुक्यातील व जिल्ह्यातील रुग्ण (District Patient) आहेत. तरीही रुग्ण संख्या वाढत असून नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन तहसीलदार श्री. हिरे यांनी केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com