राहाता तालुक्यात 264 करोनाबाधित रुग्ण

944 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह; 215 जणांना डिस्चार्ज
राहाता तालुक्यात 264 करोनाबाधित रुग्ण
corona

राहाता |प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात काल 264 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. बरे होवून घरी जाणार्‍यांची संख्या 215 वर जावून पोहोचली आहे. तर 944 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.

राहाता तालुक्यात आतापर्यंत 18582 करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 17378 रुग्ण बरे होवून घरी गेले. ,आज 944 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह आहेत.

त्यात रुग्णांपैकी जिल्हा रुग्णालयात 03 खासगी रुग्णालयात 178 तर अँटीजन चाचणीत 83 रुग्ण आढळून आले आहेत. तर 215 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.

राहाता तालुक्यातील अस्तगाव-02, चोळकेवाडी-01, राजुरी-07, ममदापूर-01, पिंपरी निर्मळ-01, एकरुखे-08, दाढ बुद्रुक-11, हसनापूर-01, दुर्गापूर-01, चंद्रापृर-06, लोणी बुद्रुक-22, गोगलगाव-05, लोणी खुर्द-12, डोर्‍हाळे-04, नांदुर्खी बुदुक-12, केलवड बुदुक-07, केलवड खुर्द-01, साकुरी-04, खडकेवाके-01, आडगाव बुद्रुक-02, पिंपरी लौकाई-01, कोल्हार-13, भगवतीपूर-09, बाभळेश्वर बुद्रुक-07, बाभळेश्वर खुर्द-01, पाथरे-01 हनुमंतगाव-01, सावळीविहिर बुद्रुक-15, सावळीविहिर खुर्द-03, निमगाव-04, निघोज-05, रुई-01, पिंपळवाडी-02, वाकडी-11, एलमवाडी-02, चितळी-05, पुणतांबा-26, रांजणखोल-12, नांदूर बुद्रुक-08, आणि रामपूरवाडी-01, असेएकूण 237, शिर्डी-11, राहाता-06, बाहेरील तालुक्यातील 10 असे एकूण 264 रुग्ण आढळून आले आहे.

काल राहाता तालुक्यात करोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढल्याने तालुक्यातील नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. परवा 98 करोनाबाधित रुग्ण आढळून आले होते तर काल पुन्हा हा आकडा 264 वर जावून पोहोचला आहे. आहेत. बरे होवून घरी जाणार्‍यांचे प्रमाण चांगले असून 215 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या तालुक्यात 944 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण असून जिल्ह्यातील व तालुक्यातील विविध रुग्णालयांमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com