
राहाता |का. प्रतिनिधी| Rahata
राहाता तालुक्यात (Rahata) 32 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) दिसून येत आहे. काल 13 रुग्ण बरे होऊन गेल्यामुळे काल अॅक्टीव्ह काल अॅक्टीव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या 112 वर जाऊन पोहोचली आहे.
राहाता तालुक्यात आतापर्यंत 20997 करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 20885 रुग्ण बरे होऊन घरी गेले.
त्यात खासगी रुग्णालयात 19 तर अँटीजेन चाचणीत 13 रुग्ण आढळून आले आहेत. तर 13 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
राहाता तालुक्यातील (Rahata) बाभळेश्वर-01, लोणी बुद्रुक-03, गोगलगाव-05, हसनापूर-03, जळगाव-02, केलवड बुदु्रक-01, लोहगाव-01, ममदापूर-01, नांदुर्खी-02, वाकडी-01, सावळीविहिर-01 असे 24 रुग्ण असून शिर्डी-00, राहाता-07 बाहेरील तालुक्यातील 01 असे एकूण 32 रुग्ण आढळून आले आहेत. काल राहाता तालुक्यात करोनाबाधितांची (Covid 19 Positive Patient) संख्या 32 असून 13 जणांना बरे वाटल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे 112 रुग्ण अॅक्टीव्ह दिसून येत असून ते तालुक्यात व तालुक्याबाहेरील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.