राहाता तालुक्यात नव्याने 25 करोना संक्रमित
सार्वमत

राहाता तालुक्यात नव्याने 25 करोना संक्रमित

सर्वाधिक 10 रुग्ण शिर्डीतील एका हॉटेलचे कर्मचारी

Arvind Arkhade

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात दिवसभरात 87 रॅपीड टेस्ट करण्यात आल्या. त्यात 25 जण करोना बाधित निघाले असून सर्वाधिक 10 रुग्ण शिर्डीत आढळल्याने शिर्डीकरांची चिंता वाढली आहे.

राहाता तालुक्यात पुन्हा एकदा करोना रुग्णांची संख्या वाढत असून काल दिवसभरात 25 रुग्णांना करोनाची बाधा झाल्याचे तपासणीत उघड झाले असून यातील 10 रुग्ण हे एकट्या शिर्डीतील एका हॉटेलमधील कामगार आहेत. दिवसभरात तालुक्यात एकूण 87 जणांची रॅपीड टेस्ट करण्यात आली.

त्यामध्ये शिर्डीत 10 रुग्ण, गोगलगाव 3 रुग्ण, राहाता 3 रुग्ण, बाभळेश्वर 1, लोणी खुर्द 4 रुग्ण, सावळीविहीर 2, लोणी बु. 1, चितळी 1 असे रुग्ण आढळले आहेत.गेले चार दिवस निरंक असलेल्या राहाता शहरात दोन दिवसांत 8 करोना संक्रमितांची भर पडली असून यातील एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश आहे. आतापर्यंत राहाता शहरातील चार नागरिकांचा करोनामुळे मृत्यू झाल्याने राहाता शहरातही नागरिकांची चिंता वाढली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com