राहाता तालुक्यात 251अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

34 करोनाबाधितांची भर
राहाता तालुक्यात 251अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

राहाता |प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी डिस्चार्ज घेणार्‍यांचे प्रमाणही घटले आहे. राहाता तालुक्यात काल केवळ 34 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्यात करोनाबधित अ‍ॅक्टीव्ह संख्या 251 वर जाऊन पोहोचली आहे.

राहाता तालुक्यात आतापर्यंत 20144 करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 19985 रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यात रुग्णांपैकी जिल्हा रुग्णालयात 00, खासगी रुग्णालयात 23 तर अँटीजेन चाचणीत 11 रुग्ण आढळून आले आहेत. तर 00 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

राहाता तालुक्यातील अस्तगाव-01, चोळकेवाडी-01, ममदापूर-02, रांजणगाव-01, दाढ बुदुक-05, लोणी बुद्रुक-01, कनकुरी-01, नांदुर्खी बुदुक-01, साकुरी-01, खडकेवाके-01, कोल्हार-04, बाभळेश्वर बुद्रुक-01, लोहगाव-02, सावळीविहिर बुद्रुक-01, नपावाडी-02, असे एकूण 25 शिर्डी-02, राहाता-05 बाहेरील तालुक्यातील 02 असे एकूण 34 रुग्ण आढळून आले आहे.

काल राहाता तालुक्यात करोनाबाधितांची संख्या वाढली आहे. तरी डिस्चार्ज घेणार्‍यांची संख्याही शुन्य झाली. त्यामुळे अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्याही वाढली. काल 34 करोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे तालुक्यात काल 251 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते तालुक्यात व तालुक्या बाहेरील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com