राहाता तालुक्यात 175 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

राहाता तालुक्यात 175 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

राहाता |का. प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याने तसेच डिस्चार्ज घेणार्‍यांचे प्रमाणही वाढले आहे. राहाता तालुक्यात काल 20 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून केवळ 35 नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

राहाता तालुक्यात आतापर्यंत 20079 करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 19887 रुग्ण बरे होवून घरी गेले.

काल आढळलेल्या रुग्णांपैकी जिल्हा रुग्णालयात 01 खासगी रुग्णालयात 19 तर अँटीजन चाचणीत 15 रुग्णांचा समावेश आहे.

राहाता तालुक्यातील अस्तगाव-02, रांजणगाव-01, दाढ बुद्रुक-02, लोणी-01, गोगलगाव-03, लोणी-04 कनकुरी-01, केलवड बुद्रुक-01, खडकेवाके-01, आडगाव बुद्रु-05, कोल्हार-01, पाथरे-02, हनुमंतगाव-01, लोहगाव-03, वाकडी-01, पुणतांबा-04, असे एकूण 33. शिर्डी-00, राहाता-00 बाहेरील तालुक्यातील 2 असे एकूण 35 रुग्ण आढळून आले आहे.काल केवळ 175 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण होते. तर 20 जणांना डिस्चार्ज मिळला असला तरी काल शिर्डी शहर व राहाता शहर एकही नवीन करोनाबाधीत आढळून आला नाही.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com