राहाता तालुक्यात केवळ 99 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

78 जणांना डिस्चार्ज; 48 करोनाबाधित रुग्ण
राहाता तालुक्यात केवळ 99 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

राहाता |प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याने तसेच डिस्चार्ज घेणार्‍यांचे प्रमाणही वाढल्याने राहाता तालुक्यात 99 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. काल 78 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून नवीन 48 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

राहाता तालुक्यात आतापर्यंत 19792 करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 19592 रुग्ण बरे होऊन घरी गेले. आज 78 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह आहेत.

या रुग्णांपैकी जिल्हा रुग्णालयात 02, खासगी रुग्णालयात 30 तर अँटीजेन चाचणीत 16 रुग्ण आढळून आले आहेत. तर 48 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

राहाता तालुक्यातील एकरुखे-02, दाढ बुदु्रक-01, हसनापूर-01, लोणी बुद्रुक-04, गोगलगाव-02, लोणी खुर्द-04, नांदुर्खी बुदुक-01, कोर्‍हाळे -01, दहेगाव-03, पिंपळस-01, पिंपरी लौकाई-01, कोल्हार-05, बाभळेश्वर-01, भगवतीपूर-01, तिसगाववाडी-01, वाकडी-02, चितळी-01, पुणतांबा-03, रांजणखोल-01, नांदुर बुद्रुक-03, असे एकूण 39. शिर्डी-06, राहाता-01, बाहेरील तालुक्यातील 02 असे एकूण 48 रुग्ण आढळून आले आहेत.

काल राहाता तालुक्यात करोनाबाधितांची संख्या खूपच कमी झाल्याने राहाता तालुक्यात सर्वत्रच चांगला दिलासा मिळाला आहे. काल केवळ 48 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्याच दरम्यान करोनातून बरे होऊन 78 जण घरी गेले आहेत. सध्या तालुक्यात केवळ 99 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण असून जिल्ह्यातील व तालुक्यातील विविध रुग्णालयांमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com