राहाता तालुक्यात नवीन 319 करोनाबाधित

301 रुग्ण बरे होवून घरी
राहाता तालुक्यात नवीन 319 करोनाबाधित

राहाता |प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात काल पुन्हा करोनाने आपला चढता आलेख कायम ठेवला असून काल 319 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. बरे होवून घरी जाणार्‍यांचे प्रमाण अधिक आहे. काल 301 जण बरे झाले आहेत.

त्यात रुग्णांपैकी जिल्हा रुग्णालयात 67 खासगी रुग्णालयात 198 तर अँटीजन चाचणीत 54 रुग्ण आढळून आले आहेत. तर 301 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. तालुक्यात अस्तगाव-11, मोरवाडी-01, राजुरी-12, ममदापूर-05, पिंपरी निर्मळ-02, एकरुखे-03, रांजणगाव-02, दाढ बुदुक-04, हसनापूर-01, लोणी बुदुक-31, गोगलगाव-05, लोणी खुर्द-41, डोर्‍हाळे-03, कनकुरी-02, कोर्‍हाळे08, कुलकवड बुदुक-01, साकुरी-05, खडकेवाके-02, कोल्हार-14, भगवतीपूर-01, बाभळेश्वर बुद्रक-07, तिसगाववाडी-01, पाथरे-01, हनुमंतगाव-03, लोहगाव-03, सवळीविहिर बुद्रुक-11, निमगाव-06, निघोज-08, पिंपयवाडी-08, शिगवे-03, वाकडी-09, जळगाव-02, धनगरवाडी-03, चितळी-15, पुणतांबा-05, रांजणखोल-06, नांदूर बुद्रुक-09, नांदूरखुर्द-06, नपावाडी-04 असे राहाता ग्रामीण एकूण 261, शिर्डी-20, राहाता-19, बाहेरील तालुक्यातील 19 असे एकूण 319 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

गेले चार ते पाच दिवस करोनाने राहाता तालुक्यात दिलासा दिला होता. मात्र काल पुन्हा तालुक्यात करोनाने कहर केला आहे. काल पुन्हा 316 करोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे नागरिकांनी पुन्हा चिंता व्यक्त केली आहे. राहाता तालुक्यात कडक लॉकडाऊन करुनही रुग्ण संख्येत वाढ होत असल्यामुळे अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com