राहाता तालुक्यात करोनाचा पुन्हा कहर

301 करोनाबाधित रुग्ण; 209 डिसचार्ज
राहाता तालुक्यात करोनाचा पुन्हा कहर

राहाता |प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात काल पुन्हा करोनाने डोके वर काढले असून काल 301 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. मधल एक दिवस सोडला तर पुन्हा काल 300 चा आकडा कायम ठेवला आहे. बरे होवून घरी जाणार्‍यांचे प्रमाण अधिक आहे. काल 209 जण बरे झाले आहेत.

त्यात रुग्णांपैकी जिल्हा रुग्णालयात 54 खासगी रुग्णालयात 135 तर अँटीजन चाचणीत 112 रग्ण आढळून आले आहेत. तर 209 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. तालुक्यात सर्वाधिक राहाता शहरात 18, तर लोणी बुदुक 35, लोणी खुर्द-20, कोल्हार-13 असे रुग्ण आढळून आले आहेत.

ग्रामीण भागात -अस्तगाव-12, मोरवाडी-03, चोळकेवाडी-02, राजुुरी-02, ममदापूर-02, पिंपरीनिर्मळ -07, एकरुखे-02, रांजणगाव-03, हसनापूर-03, चंद्रापूर-02, लोणी बुद्रुक-35, लोणी खुर्द-25, डोर्‍हाळे-02, कनकुरी-05, नांदुर्खी बुद्रुक-04, कोर्‍हाळे-01, केलवड बुद्रुक -04, साकुरी-11, दहेगाव-01, खडकेवाके-01 कोल्हार-13, भगवतीपूर-02, बाभळेश्वर बुद्रुक-03, पाथरे-01, हनुमंतगाव-04, लोहगाव-01, सावळीवहिर बुद्रुक-13, सावळीविहिर खुर्द- 02, पिंपळवाडी-07, शिंगवे-05, वाकडी-17, जळगाव-02, धनरगरवाडी-03, एलमवाडी-04, चितळी-09, पुणतांबा-09 रांजणखोल-23, नांदुर बुद्रुक-03, रामपूरवाडी-01, नपावाडी-10, असे राहाताग्रामीण एकूण 261, शिर्डी-20, राहाता शहर 18 असे तालुक्यात एकूण 301 रुग्ण आढळून आले आहेत.

गेल्या दहा ते बारा दिवसापासून राहाता तालुक्यात करोना बाधितांचा आकड्याने उच्चांक गाठला होता. मात्र परवा केवळ 159 करोना बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे तालुक्यात काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र काल पुन्हा करोनाने कहर केला असून तालुक्यात 300 चा आकडा पार केला आहे. त्यामुळे तालुक्यात पुन्हा चिंता वाढली असून पुन्हा रेमडीसीवीर इंजेक्शनचा तुटवडा आणि ऑक्सीजनचा तुटवडा जाणवणार आहे. त्यामुळे रुग्ण व रुग्णांचे नातेवाईकांना पुन्हा डोकेदुखी ठरली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com