राहुरी तालुक्यात 72 तासात 420 करोना रूग्ण वाढले

राहुरी तालुक्यात 72 तासात 420 करोना रूग्ण वाढले

राहुरी |प्रतिनिधी|Rahuri

राहुरी तालुक्यात दररोज करोनाबाधितांची संख्या शतकापार झळकत आहे. गेल्या 72 तासात राहुरी तालुक्यात 420 जणांना करोनाची बाधा झाल्याचे आढळून आले. मात्र, दिवसेंदिवस करोनाबाधितांची संख्या वाढूनही पोलीस, महसूल आणि आरोग्य खाते अद्यापही गाफील असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

सध्या राहुरी तालुक्यात जनता कर्फ्यू सुरू आहे. मात्र, तरीही करोनाबाधितांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. त्यावर नियंत्रण आणण्यात प्रशासकीय यंत्रणेला अपयश आले आहे. तालुक्यासह राहुरी शहरातही सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला आहे. भाजीपाला घरोघरी जाऊन विक्री करण्याचे आदेश असताना राहुरी शहरात खुलेआम बाजार भरविला जात असून नागरिकांची भाजीपाला खरेदीसाठी गर्दी होत आहे. त्याकडे प्रशासनाने डोळेझाक केली आहे. त्यामुळे राहुरी शहरात करोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे.

तर ग्रामीण भागात लॉकडाऊन असूनही नागरिक बाहेर फिरत असून विनामास्क नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे आणखी रूग्णसंख्येत भर पडली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com