राहाता तालुक्यात 231 नवीन करोनाबाधित

1321 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह; लोणी बुद्रुक 30, पुणतांबा 30 रुग्ण
राहाता तालुक्यात 231 नवीन करोनाबाधित

राहाता |प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात काल पुन्हा करोनाने आपला चढता आलेख कायम ठेवला असून काल 231 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. बरे होवून घरी जाणार्‍यांचे प्रमाण कमी झाले आहे.

राहाता तालुक्यात आतापर्यंत 17808 करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 16374 रुग्ण बरे होवून घरी गेले. तर आतापर्यंत 140 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तर आज 1321 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह आहेत.

त्यात रुग्णांपैकी जिल्हा रुग्णालयात 84 खासगी रुग्णालयात 85 तर अँटीजन चाचणीत 62 रग्ण आढळून आले आहेत. तर 231 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.

तालुक्यात अस्तगाव-01, राजुरी-06, ममदापूर-01, पिंपरी निर्मळ-01, एकरुखे-02, रांजणगाव-06, दाढ बुद्रुक-07, हसनापूर-02, दुर्गापूर-03, चंद्रापूर-01, लोणी बुद्रुक-30, गोगलगाव-04, लोणी खुर्द-16, कनकुरी-01, कोर्‍हाळे-02, केलवड बुदुक-08, साकुरी-01, दहेगाव-01, पिंपळस-01, कोल्हार-13, भगवतीपूर-07, बाभळेश्वर बुद्रुक - 06, तिसगाववाडी- 01, हनुमंतगाव-03, सावळीविहिरी बुदु्रक-11, सावळीविहिर खुर्द-01, निमगाव-02, रुई-01, पिंपळवाडी-02, शिंगवे-01, वाकडी-06, जळगाव-01, धनगरवाडी-02, चितळी-03, पुणतांबा-30, रांजणखोल-05, नांदूर बुद्रुक-01, नपााडी-01, असे ग्रामीण 189 रुग्ण, शिर्डी-14, राहाता-20, बाहेरील तालुक्यातील 8 असे एकूण 231 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

राहाता तालुक्यात करोनाबाधितांची संख्या कमी होत नसल्यामुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. सध्या तालुक्यात 1321 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण असून जिल्ह्यातील व तालुक्यातील विविध रुग्णालयांमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तसेच तालुक्यात आतापर्यंत 140 जणांचा मृत्यू झाला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com