राहाता तालुक्यात 398 जणांना डिस्चार्ज

121 करोनाबाधित रुग्ण; लोणी बुद्रुक 48
राहाता तालुक्यात 398 जणांना डिस्चार्ज
करोना

राहाता |प्रतिनिधी|Rahata

राहाता तालुक्यात काल पुन्हा करोनाने आपला चढता आलेख कायम ठेवला असून काल 121 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. बरे होवून घरी जाणार्‍यांचे प्रमाण अधिक आहे. काल 398 जण बरे झाले आहेत.

त्यात रुग्णांपैकी जिल्हा रुग्णालयात 02 खासगी रुग्णालयात 110 तर अँटीजन चाचणीत 09 रग्ण आढळून आले आहेत. तर 398 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. तालुक्यात अस्तगाव-04, ममदापूर -02, एकरुखे-01, दाढ बुद्रुक-02, हसनापूर-03, चंद्रापूर-01, लोणी बुदुक-48, गोगलगाव-01, लोणी खुर्द-10, कोर्‍हाळे-01, केलवड बुद्रुक -01, पिंपळस-02, पिंप्री लौकाई-04, कोल्हार-10, बाभळेश्वर बुद्रुक-10,पाथरे-03, हनुमंतगाव-01, सावळीविहिर बुद्रुक-01, निघोजन-01, पिंपळवाड-01, धनगरवाडी-01, पुणतांबा-04, रांजणखोल-06, असे 114, शिडीर-02, राहाता-03, बाहेरील तालुक्यातील 2 असे एकूण 121 रुग्ण आढळून आले आहेत.

गेल्या दिड महिन्याच्या कालावधीनंतर राहाता तालुक्यात 121 रुग्ण आढळल्यानंतर मोठा दिलासा मिळाला आहे. शिर्डी व राहाता प्रत्येकी 2 व 3 असे रुग्ण आढळून आल्याने शिर्डीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच बरे होवून घरी जाणार्‍यांची संख्या ही 398 झाल्याने राहाता तालुक्यातील करोनाची परिस्थिती चांगली झालेली दिसून येत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com