राहाता तालुक्यात कहरच; 312 करोनाबाधित रूग्ण

सर्वाधिक चितळी-67, राहाता शहर-60 जळगाव-25, लोणी खुर्द-22
राहाता तालुक्यात कहरच; 312 करोनाबाधित रूग्ण

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात दिवसभरात करोनाचा मोठा कहर सुरुच आहे.तालुक्यातील चितळीत सर्वाधिक

67 रुग्ण असून राहाता शहर-60, जळगाव-25, तर लोणी खुर्द 22 असे सर्व रुग्ण असून तालुक्यात 312 सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

अस्तगाव-07, राजुरी-02, ममदापूर-01, पिंपरी निर्मळ -01, दाढ बुद्रुक-09, दुर्गापूर-04, लोणी बुद्रुक-17, गोगलगाव-01, लोणीखुर्द-22, डोर्‍हाळे-02, नांदुर्खी बुदुक-02, कोर्‍हाळे-07, केलवड-05, साकुरी-06, आडगाव खुर्द-02, कोल्हार-05, बाभळेश्वर-01, तिसगाववाडी -01, लोहगाव-02, सावळीविहिर बुद्रुक-02, रुई-07, पिंपळवाडी-07, शिंगवे-01, वाकडी-09, जळगाव-25, एलमवाडी-02, चितळी-67 पुणतांबा-08, रांजणखोल-07, रामपूरवाडी-07, नपावाडी-01 राहाता ग्रामीणमध्ये 140, शिर्डी-12, राहाता शहर-60 असे सर्व मिळून 312 रुग्ण आढळून आले आहेत.

तालुक्यात एकूण 312 रुग्णांपैकी जिल्हा रुग्णालयात 21 रुग्ण असून खासगी रुग्णालयात 81 तर अँटीजेन चाचणीत 210 रुग्ण आढळून आले आहेत. तर 270 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राहाता तालुक्यातील शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात करोना बाधितांची संख्या जास्त प्रमाणात आहे.

दिवसागणिक करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आरोग्य विभागाकडे रुग्णांची कमी नोंद असली तरी ही संख्या जास्त असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अस्तगावमध्ये दुसर्‍या टप्प्यातील या करोनाच्या महामारीने चौघांचा बळी घेतला आहे. करोनाचे गांभीर्य असतानाही नागरिक काळजी घेत नसल्याने रुग्णसंख्या वाढण्यास मदतच होत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com