राहाता : अत्यावश्यक सेवा व लॉकडाऊनमध्ये काम करणार्‍या नागरिकांंची करोना टेस्ट

राहाता : अत्यावश्यक सेवा व लॉकडाऊनमध्ये काम करणार्‍या नागरिकांंची करोना टेस्ट

राहाता (प्रतिनिधी) - करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आता जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक सेवा देणारे आणि तेथे ग्राहक म्हणून येणार्‍यांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्याची मोहीम हाती घेतली आहे. राहाता शहरात भाजीपाला विक्रेते, किराणा विक्रेते, दुध विक्रेते तसेच वाईन्स वितरण करणार्‍यांची करोना चाचणी करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

रविवारी शहरात 84 रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात 4 जणांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या उपक्रमामुळे करोनाचा संसर्ग कमी होणार असल्याचे मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांनी सांगितले.

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लवकर करोना टेस्ट आणि उपचार महत्वाचे आहेत. लक्षणे दिसत नसल्याने काही जण करोना संसर्गाचे सुपर स्प्रेडर ठरत आहेत. अत्यावश्यक सेवेत व्यवसाय करणारे या टेस्टमध्ये पॉझिटीव्ह झाल्याने त्यांना रुग्णवाहिकेतून शिर्डी येथील कोविड केअर सेंटरमध्ये नेण्यात आले. लक्षण दिसून न येणारे तसेच सौम्य लक्षणे आढळणारे सुपर स्प्रेडर म्हणून वावरत आहे. त्यामुळे करोना संसर्गाचा धोका वाढत आहे. करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्यात अशी मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेमुळे संसर्गाचे स्पॉट ठरत असलेल्या अत्यावश्यक सेवेतील नागरिकांचा शोध घेतला जात असल्याने करोनाचा संसर्ग नक्कीच कमी होणार आहे.

नगरपालिका आणि ग्रामीण रुग्णालयाच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या मोहिमेत नगरपालिकेचे कार्यालयीन अधिक्षक नवनाथ जगताप, अशोक साठे, विजयकुमार आवारे, रवींद्र बोठे, अनिल कुंभकर्ण, दिलीप सोनवणे, फिलीप दुशिंग, किसन थोरात, सुनिल मोकळ, प्रफुल निकाळे, केशव बोठे, छबू लांडगे आदी कर्मचार्‍यांनी सहभाग घेत आपले कर्तव्य बजावले आहे. ही मोहीम काही दिवस अशीच सुरू राहणार असून अत्यावश्यक सेवा सुरु असलेल्या ठिकाणी जास्तीत जास्त चाचण्या घेणार असल्याचे मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com