राहाता तालुक्यात 24 करोना पॉझिटिव्ह रुग्ण
सार्वमत

राहाता तालुक्यात 24 करोना पॉझिटिव्ह रुग्ण

शिर्डीत एकाच इमारतीतील 10 व अन्य दोन असे 12 रुग्ण

Arvind Arkhade

शिर्डी|प्रतिनिधी| Shrirampur

काल राहाता तालुक्यात 80 जणांच्या घशाचे स्त्राव घेण्यात आले असून 24 जणांचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात शिर्डी शहरात एकाच इमारतीत 10 रुग्ण तसेच अन्य असे 12 आढळून आले आहेत. त्यामुळे शिर्डीत आतापर्यंत करोनाबाधितांचा आकडा हा 131 वर जाऊन पोहोचला आहे. लोणी बुद्रुक येथील एका व्यक्तीचा प्रवरा कोव्हिड सेंटरमध्ये उपचार सुरू असताना काल पहाटे मृत्यू झाला.

काल राहाता तालुक्यातील 80 जणांची रॅपीड तपासणी करण्यात आली आहे. त्यात शिर्डीत 12, राहाता शहरात 3, बाभळेश्वर 2, लोणी 6, प्रवरानगर 1 असा 24 रुग्णांचा समावेश आहे. यात 56 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. लोणी खुर्द गावातील आशीर्वादनगर मधील एका बाधित रुग्णाचा बुधवारी पहाटे मृत्यू झाला.या व्यक्तीच्या कुटुंबातील सहा जणांचे स्राव तपासल्यानंतर त्याची पत्नी, बहीण, मुलगा, सून आणि नातू बाधित असल्याचे दिसून आले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com