राहाता तालुक्यात करोना रूग्ण संख्या 300 पार
सार्वमत

राहाता तालुक्यात करोना रूग्ण संख्या 300 पार

Arvind Arkhade

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात पुन्हा करोनाचा कहर एकासदिवसात 18 जण करोनाच्या विळख्यात सापडले असून सर्वाधिक 11 रूग्ण लोणीत 4 जण राहाता शहरात शिर्डी 2 व चितळी एक असे आतापर्यंत 302 जणांना करोनाची बाधा झाली होती. त्यातील 248 जण बरे होऊन घरीत परतले असून 51 जण उपचार घेत आहे.

आज दिवसभरात राहाता तालुक्यात 18 जणांचे अहवाल निगेटीव्ह आल्याने चिंता वाढली असून सर्वाधिक रूग्ण लोणी बु येथील 11 जण असल्याने लोणी येथील विठ्ठलप्रभा सोसायटी शेजारील परीसर कंटेनमेंट क्षेत्र घोषीत केले.

तर गेल्या दहा दिवसापासून राहाता शहर व साकुरीत करोना रूग्णांची संख्या वाढत असून मंगळवारी राहाता शहराच चार रूग्णांचा अहवाल पॉझीटीव्ह आल्यानेशहरातील विशाल नगर, राहाता लोढा हॉस्पिटल जवळील पिपाडा कॉलनी, शनिमंदिर रोडवरील साई कॉलनी, चितळी रोड वरील काही भाग तहसिलदार कुंदन हिरे यांच्या आदेशाने कंटेनमेंट क्षेत्र घोषीत केले आहे.

राहाता कालुक्यात करोबाधित रूग्ण संख्येने 300 चा टप्पा ओलंडला असून यातील 248 रूग्ण उपचार घेऊन घरी परतले तर 51 जण विविध कोवीड सेंटर मधे उपचार घेत असल्याची माहीती तहसिलदार कुंदन हिरे यांनी दिली आहे.

राहाता व साकुरी येथे रूग्णांचे प्रमान वाढत असताना प्रशासन योग्य ति काळजी घेत नसल्याच्या नागरीकांच्या तक्रारी असून ज्या कुटूंबात करोना बाधीत रूग्ण सापडतात त्या कुटूंबातील व्यक्ती क्वारंटाईन करने गरजेचे असताना अनेक व्यक्ती सर्वत्र फिरत असल्याने करोनाचा फैलाव वाढत असल्याचे नागरीकांच्या तक्रारी आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com