राहाता : 301 जण बरे होऊन घरी परतले

राहाता : 301 जण बरे होऊन घरी परतले

राहाता |प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात काल पुन्हा करोनाने आपला चढता आलेख कायम ठेवला असून काल 260 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. बरे होवून घरी जाणार्‍यांचे प्रमाण अधिक आहे. काल 301 जण बरे झाले आहेत.

त्यात रुग्णांपैकी जिल्हा रुग्णालयात 92 खासगी रुग्णालयात 74 तर अँटीजन चाचणीत 94 रग्ण आढळून आले आहेत. तर 301 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. तालुक्यात राहाता शहरात 13, शिर्डी-09 तर लोणी बुदुक 59, लोणी खुर्द-47, पुणतांबा-14, असे रुग्ण आढळून आले आहेत.

ग्रामीण भागात -अस्तगाव-05, राजुुरी- 05, ममदापूर-02, पिंपरीनिर्मळ -01, दाढ बुद्रुक-03, दुर्गापूर-07, चंद्रापूर-04, लोणी बुद्रुक-59, गोगलगाव-05, लोणी खुर्द-47, डोर्‍हाळे-03, कनकुरी-04, नांदुर्खी बुद्रुक-12, कोर्‍हाळे-01, केलवड बुद्रुक -01, साकुरी-03, दहेगाव-01 खडकेवाके-02 कोल्हार-05, भगवतीपूर-04, बाभळेश्वर बुद्रुक-01, तिसगाववाडी-03, हनुमंतगाव-08, लोहगाव-02, निघोज-01, पिंपळवाडी-01, वाकडी-01, धनगरवाडी-05, एलमवाडी-01, चितळी-13, पुणतांबा-14, रस्तापूर-01, रांजणखोल-01, नपावाडी-02 असे एकूण 228 राहाता शिर्डी-09, राहाता शहर 13 असे तालुक्यात एकूण 260 रुग्ण आढळून आले आहेत.

करोनाने आपला चढता आलेख हा कायमसारखाच ठेवला आहे. मात्र काल बरे होवून घरी जाणार्‍यांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे राहाता तालुक्यातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. करोनाला आळा घालण्यासाठी जास्त जास्त नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे तसेच नियमाचे पालन करावे, असे आवाहन तहसीलदार कुंदन हिरे यांनी केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com