राहाता तालुक्यात 280 जणांना डिस्चार्ज

216 करोनाबाधितांची भर ; लोणी बुद्रुक-25, पुणतांबा-19
राहाता तालुक्यात 280 जणांना डिस्चार्ज

राहाता |प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात काल पुन्हा करोनाने आपला चढता आलेख कायम ठेवला असून काल 216 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. बरे होवून घरी जाणार्‍यांचे प्रमाण कमी झाले आहे. काल 280 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.

त्यात रुग्णांपैकी जिल्हा रुग्णालयात 00 खासगी रुग्णालयात 178 तर अँटीजन चाचणीत 38 रग्ण आढळून आले आहेत. तर 280 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. तालुक्यात अस्तगाव-02, चोळकेवाडी-01, राजुरी-06, ममदापूर-01, पिंपरी निर्मळ-01, एकरुखे-04, रांजणगाव-02, हसनापूर-01, चंद्रापूर - 01, लोणी बुद्रुक-25, गोगलगाव-01, लोणी खुर्द-09, डोर्‍हाळे-02, कोर्‍हाळे-03, वाळकी-01, केलवड बुदुक-11, साकुरी-03, पिंपळस-01, आडगाव बुद्रुक-02, कोल्हार-13, बाभळेश्वर बुद्रुक -13, तिसगाववाडी-06, पाथरे-06, हनुमंतगाव-09, लोहगाव-01, सावळीविहिरी बुद्रुक-07, सावळीविहिर खुर्द-02, निमगाव-03, निघोज-01, पिंपळवाडी-04, वाकडी-05, जळगाव-01, धनगरवाडी-01, चितळी-03, पुणतांबा-19, रांजणखोल-01, नादूर बुद्रुक-01, रामपूरवाडी-01, नपावाडी-03, असे ग्रामीण 179 रुग्ण, शिर्डी-19 राहाता-15, बाहेरील तालुक्यातील 3 असे एकूण 216करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

राहाता तालुक्यात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येपेक्षा करोनाबाधित रुग्ण बरे होवून घरी गेलेल्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे राहाता तालुक्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. परंतु करोनाबाधितांचा 200ते 300 संख्येच्या दरम्यान असलेला आकडा कमी झाल्यास करोना आटोक्यात येवू शकेल.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com