राहाता तालुक्यात 216 करोनाबाधित रुग्ण

चितळी-45, लोणी बुद्रुक- 24, राहाता शहर-55
राहाता तालुक्यात 216 करोनाबाधित रुग्ण

राहाता |तालुका प्रतिनिधी|Rahata

राहाता तालुक्यात दिवसभरात करोनाची वाढती संख्या पहाता काल तालुक्यात 216 जण करोनाबाधित आढळून आले आहेत.

तालुक्यात एकूण 207 रुग्णांपैकी जिल्हा रुग्णालयात 13 रुग्ण असून खासगी रुग्णालयात 76 तर अँटीजेन चाचणीत 127 रग्ण आढळून आले आहेत. तर 212 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राहाता ग्रामीण 146, शिर्डी-06, राहाता शहर-55, असे ग्रामीण व शहरी मिळून 207 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

गेल्या आठवड्यापासून राहाता तालुक्यातील शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात करोना बाधितांची संख्येचे प्रमाण जास्त आहे.

गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून राहाता तालुक्यात करोनाने कहर केला आहे. अहमदनगर जिल्ह्यात करोनाबाधितांचा आकडा हा दोन किंवा तीन नंबरवरच राहिला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचा विषय आहे. सध्या रेमडेसिवीर इनजेक्शनचा पुरवठा आ. विखे यांच्याकडून करण्यात आल्यामुळे दिलासा मिळाला आहे. परंतु ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्यामुळे हे रुग्ण अत्यवस्थ होत असतात. त्यामुळे अनेकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com