
राहाता|तालुका प्रतिनिधी|Rahata
राहाता तालुक्यात करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. काल पुन्हा तालुक्यात 12 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्यात करोनाबाधितांचा आकडा 240 वर जावून पोहोचला आहे.
काल सकाळी आलेल्या 31 अहवालात 5 रुग्ण आढळून आले आहेत. त्यात शिर्डीत-2 राहात्यात 2 तर दाढ मध्ये 1 असे रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर आलेल्या 11 अहवालांत सर्वच्या सर्व 11 अहवाल हे निगेटीव्ह आले आहेत.
काल राहाता येथे रॅपीड टेस्ट घेण्यात आली. यात 32 जणांचे रॅपीड टेस्ट घेण्यात येऊन त्यातील एक जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर 31 निगेटिव्ह अहवाल मिळून आले आहेत. प्रवरा मेडिकल ट्रस्ट या रुग्णालयात एकूण 99 सॅम्पल घेण्यात आले होते. यात 6 पॉझिटिव्ह अहवाल निघाले आहेत तर 93 अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. यात दाढचा व लोणीचे रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.