राहाता : 15 करोनाबाधितांची भर 16 रुग्णांना डिस्चार्ज

राहाता : 15 करोनाबाधितांची भर 16 रुग्णांना डिस्चार्ज

राहाता |का. प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात (Rahata Taluka) नव्याने 15 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळून आले आहे. काल 16 रुग्ण बरे होऊन घरी गेल्यामुळे अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या 139 झाली आहे.

राहाता तालुक्यात आतापर्यंत 21103 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळून आले. तर 20959 रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यात रुग्णांपैकी खासगी रुग्णालयात 13 तर अँटीजेन चाचणीत (Antigen Testing) 02 रुग्ण आढळून आले आहेत. तर 16 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक-01, लोणी खुर्द-02, नांदुर्खी बुद्रुक-01, केलवड बुद्रुक-01 पुणतांबा-01, शिर्डी-02, राहाता-07, असे एकूण 15 रुग्ण आढळून आले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com