राहाता तालुक्यात 207 करोनाबाधित रूग्ण

राहाता तालुक्यात 207 करोनाबाधित रूग्ण
करोना

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात दिवसभरात करोनाची वाढती संख्या पहाता काल तालुक्यात 207 जण करोनाबाधित आढळून आले आहेत.

चितळीत 45, लोणी बुदुक 45 तर राहाता शहरात 55 रुग्ण आढळून आले आहेत.

अस्तगाव-04, पिंपरी निर्मळ -03, दाढ बुदु्रक 04, दुर्गापूर-04, लोणी बुदु्रक 24, गोगलगाव-01, लोणी खुर्द 16, डोर्‍हाळे-02, कनकुरी-02, नांदुर्खी खुर्द-02, कोर्‍हाळे-02, वाळकी-03, साकुरी-01, दहेगाव-02, पिंपळस-04, कोल्हार-02, लोहगाव-01, सावळीविहिर बुद्रुक-01, निमगाव-01, रुई-01, पिंपळवाडी-01, जळगाव-04, धनगरवाडी-01, एलमवाडी-02, चितळी-45, पुणतांबा-10, रुग्ण आढळून आले आहेत.

तालुक्यात एकूण 207 रुग्णांपैकी जिल्हा रुग्णालयात 67 रुग्ण असून खासगी रुग्णालयात 91 तर अँटीजन चाचणीत 49 रग्ण आढळून आले आहेत. तर 124 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. राहाता ग्रामीण 146, शिर्डी-06, राहाता शहर-55, असे ग्रामीण व शहरी मिळून 207 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

राहाता तालुक्यातील शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात करोना बाधितांची संख्या जास्त प्रमाणात आहे. गेल्या आठवड्यात राहाता तालुक्यात करोना संसर्गाने कहरच केला होता. 200 च्या पुढे आकडा हा कमी झालाच नसल्यामुळे रुग्णांची चिंता वाढली होती. त्यात बेडची संख्या कमी आणि ऑक्सीजनची सुविधा नसल्यामुळे अनेकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. काल आ. राधाकृष्ण विखे पा. यांनी तालुक्यात 100 रेमडीसिव्हर इंजेक्शनची व्यवस्था केल्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे रेमडीसीवीर इंजेक्शन पहाण्यासाठी अन्य ठिकाणी धावपळ काही प्रमाणात का होईना थांबली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com