राहाता : 124 पॉझिटीव्ह, नियमांचा भंग प्रकरणी 4 दुकाने सिल

तहसीलमध्ये करोना कंट्रोल रूम सुरू, वैद्यकीय पथकांच्या मदतीला शिक्षकांच्या नेमणुका
राहाता : 124 पॉझिटीव्ह, नियमांचा भंग प्रकरणी 4 दुकाने सिल

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात काल 124 करोना पॉझीटिव्ह रुग्ण सापडले. शिर्डीतील साई संस्थानच्या कोव्हिड सेंटरच्या

बेडची क्षमता वाढविली तसेच दोन खासगी सेंटरलाही परवानगी देण्यात आली. तहसील कार्यालयात करोना कंट्रोल रुम सुरू करण्यात आले असून नियमांचा भंग केल्यावरून राहात्यात एक मॉलसह तीन दुकाने सिल केल्याची माहिती तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली.

तालुक्यात करोना रुग्णांची संख्या काहीशी कमी झाली असून राहाता 20 रुग्ण, शिर्डी 12, लोणी बु. 8, लोणी खुर्द 7, डोर्‍हाळे 10, चितळी 8, बाभळेश्वर 5, साकुरी 4, वाकडी 4, लोहगाव 4, दाढ 4, आडगाव 3, केलवड 3, नांदुर्खी 3, चांगदेवनगर 3, निर्मळ पिंप्री 2, नांदुर्खी खुर्द 2, रांजणगाव 2, पुणतांबा 2, कोर्‍हाळे 2, अस्तगाव 2, कोल्हार, निमगाव, भगवतीपूर, खडकेवाके, नांदूर, रूई, शिंगवे या गावांत प्रत्येकी एक रुग्ण पॉझीटीव्ह निघाला आहे.

राहाता तहसील कार्यालयात कंट्रोल रूम सुरू करण्यात आली असून 15 जणांचे पथक येथे कार्यरत केले आहे. पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांची माहिती गोळा करणे तसेच ज्या गावातील सदर रुग्ण आहे त्याची माहिती संबंधित यंत्रणेला देणे, येणार्‍या तक्रारी घेणे तसेच त्या तातडीने सोडविणे, करोना सेंटरची माहिती घेणे, रुग्णांची हेळसांड होणार नाही यावर लक्ष ठेवणे, तसेच करोना संदर्भातील सर्व यंत्रणेशी सुसुत्रता ठेवली जाईल.

तसेच तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे ग्रामीण रुग्णालयात होणारी गर्दी व करोना पॉझिटीव्ह याद्या तसेच इतर नोंदी करण्यासाठी वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या मदतीला प्रत्येक केंद्रावर चार शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून यामुळे आरोग्य कर्मचार्‍यांवरील कामाचा ताण कमी होईल. तसेच सर्व रुग्णांची माहितीही अपडेट मिळेल, अशी माहिती तहसीलदार हिरे यांनी दिली.

राहात्यात चार दुकाने सिल पालिकेची कारवाई सरकारने केलेल्या लॉकडाऊन नियमांचा भंग करून बंदी असलेल्या दुकानांपैकी साई किरण जनरल, ओम साई जनरल, महाले ज्वलर्स हे दुकाने सुरू केली तसेच कुंदन मॉलमध्ये क्षमतेपेक्षा अधिक गर्दी आढळून आल्याने चार दुकाने पुढील आदेश येईपर्यंत सिल करण्यात आल्याची माहिती पालिका कार्यालयीन अधीक्षक जगताप यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com