राहाता तालुक्यात नवीन 280 करोनाबाधित

301 जण बरे होवून घरी परतले; लोणीत 140 रुग्ण
राहाता तालुक्यात नवीन 280 करोनाबाधित

राहाता |प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात काल पुन्हा करोनाने आपला चढता आलेख कायम ठेवला असून काल 280 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. बरे होवून घरी जाणार्‍यांचे प्रमाण अधिक आहे. काल 301 जण बरे झाले आहेत.

त्यात रुग्णांपैकी जिल्हा रुग्णालयात 47 खासगी रुग्णालयात 167 तर अँटीजन चाचणीत 66 रग्ण आढळून आले आहेत. तर 301 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. तालुक्यात राहाता शहरात 13, शिर्डी-25 तर लोणी बुदुक 140, लोणी खुर्द-44, वाकडी-22, असे रुग्ण आढळून आले आहेत.

ग्रामीण भागात -अस्तगाव-07, चोळकेवाी-01, राजुुरी- 16, ममदापूर-03, पिंपरीनिर्मळ -02, एकरुखे-03, दाढ बुद्रुक-04, दुर्गापूर-01, लोणी बुद्रुक-140, गोगलगाव-02, लोणी खुर्द-44, कनकुरी-02, नांदुर्खी खुर्द-02, कोर्‍हाळे-01, केलवड बुद्रुक -07, साकुरी-04, खडकेवाके-02, पिंपळस-01, कोल्हार-06, भगवतीपूर-01, बाभळेश्वर बुद्रुक-07, पाथरे-01, सावळीविहिर बुदद्रुक-03, निघोज-01, रुई-01, पिंपळवाडी-03, वाकडी-22, जळग़ाव-03, धनगरवाडी-05, एलमवाडी-03, चितळी-12, पुणतांबा-04, रांजणखोल-18,रामपूरवाडी-02, असे ग्रामीण एकूण 235 शिर्डी-25, राहाता शहर 12 असे तालुक्यात एकूण 280 रुग्ण आढळून आले आहेत.

करोनाने आपला चढता आलेख हा कायमसारखाच ठेवला आहे. मात्र काल बरे होवून घरी जाणार्‍यांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे राहाता तालुक्यातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. करोनाला आळा घालण्यासाठी जास्त जास्त नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे तसेच नियमाचे पालन करावे, असे आवाहन तहसीलदार कुंदन हिरे यांनी केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com