सार्वमत

राहाता, साकुरीतील तिघांसह एक पोलीसही करोनाबधित

Arvind Arkhade

राहाता|तालुका प्रतिनिधी|Rahata

राहाता शहरात एका पोलीस कर्मचार्‍यासह आणखी एक असे दोघे जण करोनाबाधित निघाल्याने खळबळ उडाली आहे.

राहाता पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिसाला करोनाची लागण झाली तर शहरातील एका नागरिकालाही करोनाची लागण झाल्याने दोघेज़ण करोना बाधित झाल्याचे अहवाल खाजगी प्रयोग शाळेतून मिळाले आहेत. यातील पोलीस कर्मचारी हा लोणी येथील रहिवाशी असून त्याच्यावर लोणी कोव्हिड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत तर दुसरा रुग्ण हा नाशिकमध्ये खाजगी रुग्णालयात उपचार घेत असून दोघांचेही अहवाल रात्री उशीरा प्राप्त झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांची होणार रँपीड अँटीजेन टेस्ट- राहाता पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला कर्मचारी बाधित झाल्याने पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सर्व कर्मचारी व अधिकारी यांची सकाळी रॅपीड टेस्ट केली जाणार असून दुसर्‍या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील सर्व नागरिकांचीही टेस्ट केली जाणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com