राहाता तालुक्यात 159 करोनाबाधित रुग्ण

204 डिसचार्ज; लोणी बुद्रुक-35 तर राहाता-49 बाधित
राहाता तालुक्यात 159 करोनाबाधित रुग्ण
COVID-19

राहाता |प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात काल 159 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. दरोजची आकडेवारी पहाता काल तालुक्यात काहीसा दिलासा मिळाला असून बरे होवून घरी जाणार्‍यांचे प्रमाण अधिक आहे. काल 204 जण बरे झाले आहेत.

त्यात रुग्णांपैकी जिल्हा रुग्णालयात 38 खासगी रुग्णालयात 81 तर अँटीजन चाचणीत 40 रग्ण आढळून आले आहेत. तर 204 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.तालुक्यात सर्वाधिक राहाता शहरात 49, तर लोणी बुदुक 35, लोणी खुर्द-17, कोल्हार-08 असे रुग्ण आढळून आले आहेत.

अस्तगाव-अस्तगाव-06, मोरवाडी-02, चोळकेवाडी-01, राजुुरी-02, ममदापूर-04, पिंपरीनिर्मळ -01, एकरुखे-03, हसनापूर-01, चंद्रापूर-01, लोणी बुद्रुक-35, गोगलगाव-03,लोणी खुर्द-17, केलवड खुर्द-01, साकुरी-02, कोल्हार-08, बाभळेश्वर बुद्रुक-05, तिसगाववाडी-01, हनुमंतगाव-02, लोहगाव-02, सावळीवहिर बुद्रुक-01, रुई-01, पिंपळवाडी-01, वाकडी-01, जळगाव-02, चितळी-02, पुणतांबा-01, असे 106, शिर्डी-04, राहाता शहर 49 असे तालुक्यात एकूण 159 रुग्ण आढळून आले आहेत.

गेल्या दहा ते बारा दिवसापासून राहाता तालुक्यात करोना बाधितांचा आकड्याने उच्चांक गाठला होता. मात्र काल केवळ 159 करोना बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे तालुक्यात काहीसा दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर करोनावर मात करत बरे होवून घरी जाणार्‍यांची संख्या काल दिलासादायकच होती. काल 204 रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या, गर्दी करु नका, मास्कचा वापर करा, सोशल डिस्टन्सीं ठेवा,सॅनियटायझरचा वापर करा, असे आवाहन राहात्याचे तहसीलदार कुंदन हिरे यांनी केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com